प्रशांत किशोरचा मुस्लिमांसाठी शेखचिल्ली फार्म्युला; गांधी + आंबेडकरांच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडा, हिंदू + मुस्लिम एकता साधा!!

Prashant Kishor

नाशिक : बिहार विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहार मधल्या विधानसभा निवडणुकीसाठी नवा फॉर्म्युला पुढे आणलाय. गांधी आंबेडकरांच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडा आणि त्यानंतर हिंदू + मुस्लिम एकता साधा!! म्हणजे तुम्ही भाजपचा पराभव करू शकाल, असा फॉर्म्युला प्रशांत किशोर यांनी बिहार मधल्या मुस्लिमांना दिलाय. प्रशांत किशोर जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून बिहार विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी वेगवेगळ्या समुदायांचे मेळावे घेतले. त्यापैकी मुस्लिमांच्या मेळाव्यात त्यांनी गांधी + आंबेडकरांच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडायचा फॉर्म्युला त्यांना दिला. Prashant Kishor

प्रशांत किशोर यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचे वेगळे गणित मांडले. भारतातले मुस्लिम एकटे पडून भाजपशी लढू शकत नाही. कारण या देशामध्ये 80 % हिंदू आहेत आणि 20% मुस्लिम आहेत. पण मुस्लिमांनी हे लक्षात घेतले पाहिजे की भाजपला फक्त 40 % हिंदू मतदान करतात. उरलेले 40 % हिंदू भाजपला मतदान करत नाहीत. ते गांधी + आंबेडकरांना मानतात. त्यामुळे 20 % मुस्लिमांनी गांधी + आंबेडकरांना मानणाऱ्या 40 % हिंदूंबरोबर युती करावी म्हणजे त्यांना भाजपचा पराभव करता येईल, असा अजब दावा प्रशांत किशोर यांनी केला.

वास्तविक प्रशांत किशोर हे प्रत्यक्ष राजकीय नेता होण्यापूर्वी निवडणूक रणनीतीकार होते. ते जोपर्यंत निवडणूक रणनीतीकार होते तोपर्यंत त्यांचे डोके शाबूत होते. कारण त्यांनी राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्याला फक्त नरेंद्र मोदींना टार्गेट करत राहू नका. त्यामुळे भाजपचा फायदा होतो, असा पोक्त राजकीय सल्ला दिला होता. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यापासून अनेक नेत्यांना योग्य ते सल्ले देऊन त्यांच्या पक्षाला वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये यश मिळवून दिले होते. एखाद्या पक्षाचे कॉन्ट्रॅक्ट घेतल्यानंतर निवडणूक रणनीती ठरविण्यामध्ये प्रशांत किशोर माहीर होते.

– रणनीतीकाराचे राजकीय नेता बनल्यावर…

पण निवडणूक रणनीतीकाराचा धंदा बंद करून स्वतःच राजकीय पक्ष काढल्यानंतर “प्रशांत किशोर पांडे” हे राजकीय नेता बनले आणि तिथे त्यांची बुद्धी बिघडत गेली. प्रशांत किशोर यांनी मुस्लिमांना दिलेल्या फूटपाड्या फॉर्म्युलातून हे राजकीय सत्य बाहेर आले‌. वास्तविक 80 %, 40 %, 20 % इतक्या ठोकळबाज पद्धतीने कुठल्याही निवडणुकीचे सामाजिक गणित बसते हे प्रशांत किशोर यांनी ते फक्त निवडणूक रणनीतीकार असताना मान्य तरी केले असते का??, तर अजिबात नसते, हे त्याचे खरे उत्तर आहे. कारण कुठल्याही निवडणुकीचे सामाजिक गणित इतक्या ठोकळबाज मांडता येत नाही. निवडणुकीचे राजकीय आणि सामाजिक गणित अत्यंत गुंतागुंतीचे असते.

– निवडणुकीचे गणित एवढे ठोकळेबाज असते का??

शिवाय बिहार सारख्या जातीय गुंतागुंत असणाऱ्या राज्यात तर ते अजिबातच ते ठोकळबाज पद्धतीने पद्धतीने मांडता येत नाही. बिहार मधले मतदार आपल्या जातीय हिशेबामधून एकगठ्ठा मतदान करून कधी कोणाला जमालगोटा देतील हे खऱ्या अर्थाने कुणालाच कधी सांगता आले नाही. अशावेळी 80 % हिंदू पैकी फक्त 40 % हिंदू भाजपला मतदान करतात आणि उरलेले 40 % गांधी + आंबेडकरांना मानतात म्हणून गांधी + आंबेडकरांना मानणाऱ्या 40 % हिंदूंबरोबर 20 % मुस्लिमांनी युती करावी आणि भाजपला पराभूत करावे हे प्रशांत किशोर यांचे स्वप्नरंजन शेखचिल्लीच्या स्वप्नरंजनापेक्षा पेक्षा वेगळे नाही.

– शेखचिल्ली स्वप्नरंजन

पण प्रशांत किशोर हे शेखचिल्ली सारखे स्वप्नरंजन करू लागले. याचे कारण आता ते फक्त निवडणूक रणनीतीगार उरलेले नसून ते राजकीय नेते बनले आहेत, हे आहे. म्हणूनच बुद्धी भ्रष्ट झाल्यानंतर त्यांनी हा ठोकळेबाज फॉर्म्युला मुस्लिमांना दिला आहे.

Prashant Kishor’s Sheikh Chilli Formula for Muslims

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात