• Download App
    राहुल गांधींना प्रशांत किशोर यांनी दाखवला आरसा, म्हणाले- 'मोदी सत्तेतून बाहेर होतील या भ्रमात राहू नका, भाजप अनेक दशके मजबूत!'Prashant Kishor Says BJP Still Be Strong For Decades Rahul Gandhi Is Unable To Guess The Power Of PM Modi

    राहुल गांधींना प्रशांत किशोर यांनी दाखवला आरसा, म्हणाले- ‘मोदी सत्तेतून बाहेर होतील या भ्रमात राहू नका, भाजप अनेक दशके मजबूत!’

    निवडणूक रणनीतीकार आणि I-PACचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी नुकतेच केलेले एक वक्तव्य देशभरात चर्चेत आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, भारतीय जनता पक्ष पुढील अनेक दशके राजकारणात एक मजबूत शक्ती म्हणून कायम राहील. 40 वर्षांपूर्वी ज्या प्रकारे काँग्रेस सत्तेचे केंद्र होते, त्याचप्रमाणे भाजपही सत्तेच्या केंद्रस्थानी राहणार असल्याचे किशोर म्हणाले. निवडणूक जिंको किंवा हरो किशोर यांना विश्वास आहे की काँग्रेस आणि इतर पक्षांना “अनेक दशके” भाजपशी लढावे लागेल. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर एकदा ३० टक्के मते मिळाली की, कोणताही पक्ष राजकीय पटलावर इतक्या लवकर दूर होत नाही. Prashant Kishor Says BJP Still Be Strong For Decades Rahul Gandhi Is Unable To Guess The Power Of PM Modi


    वृत्तसंस्था

    पणजी : निवडणूक रणनीतीकार आणि I-PACचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी नुकतेच केलेले एक वक्तव्य देशभरात चर्चेत आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, भारतीय जनता पक्ष पुढील अनेक दशके राजकारणात एक मजबूत शक्ती म्हणून कायम राहील. 40 वर्षांपूर्वी ज्या प्रकारे काँग्रेस सत्तेचे केंद्र होते, त्याचप्रमाणे भाजपही सत्तेच्या केंद्रस्थानी राहणार असल्याचे किशोर म्हणाले. निवडणूक जिंको किंवा हरो किशोर यांना विश्वास आहे की काँग्रेस आणि इतर पक्षांना “अनेक दशके” भाजपशी लढावे लागेल. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर एकदा ३० टक्के मते मिळाली की, कोणताही पक्ष राजकीय पटलावर इतक्या लवकर दूर होत नाही.



    एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या निवेदनात प्रशांत किशोर म्हणाले की, भारतीय राजकारणात भाजप अनेक दशकांपर्यंत सत्तेच्या केंद्रस्थानी राहील. राहुल गांधींबद्दल प्रशांत किशोर म्हणाले की, त्यांना जे वाटतं ते होणार नाही. कदाचित काही वेळातच लोक नरेंद्र मोदींना सत्तेवरून दूर करतील असे त्यांना वाटत असेल, पण तसे नाही. किशोर म्हणाले की, जोपर्यंत तुम्हाला मोदींच्या ताकदीची कल्पना येत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांचा पराभव करण्यासाठी त्यांचा सामना करू शकणार नाही. बहुतेक लोक त्यांची ताकद समजण्यास वेळ देत नाहीत. त्यांना काय लोकप्रिय बनवत आहे हे समजेपर्यंत तुम्ही त्यांचा प्रतिकार करू शकणार नाही.

    प्रशांत किशोर यांनी गोव्यात तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली. गोवा संग्रहालयात किशोर म्हणाले, “लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नाराज आहेत आणि त्यांना सत्तेतून हाकलून देतील अशा फंदात पडू नका,” किशोर गोवा संग्रहालयात म्हणाले. लोकांनी मोदींना सत्तेतून बाहेर केले, तरीही भाजप आताच कुठेही जाणार नाही, तुम्हाला पुढील अनेक दशके यासाठी लढावे लागेल.”

    Prashant Kishor Says BJP Still Be Strong For Decades Rahul Gandhi Is Unable To Guess The Power Of PM Modi

    विशेष प्रतिनिधी

    Related posts

    मतांच्या चोरी विरोधातल्या कॅम्पेन साठी काँग्रेसकडून अभिनेत्याच्या व्हिडिओ क्लिपची चिंधी चोरी!!

    Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- दिल्ली-NCR मध्ये कुत्र्यांना पकडून नसबंदी करा; त्यांना आश्रयगृहात ठेवा

    Rahul Gandhi : राहुल गांधींचे आरोप काँग्रेसच्या नेत्यांनाच पटेनात, मतदार यादीतील अनियमिततेच्या आरोपावर कर्नाटकातील मंत्र्याचा सवाल