• Download App
    Sharad Pawar राज्यसभेसाठी अजितदादांची पसंती कुणाला??, शरद पवारांना की छगन भुजबळांना??; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून परस्पर विरोधी दावे

    राज्यसभेसाठी अजितदादांची पसंती कुणाला??, शरद पवारांना की छगन भुजबळांना??; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून परस्पर विरोधी दावे

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच तर राष्ट्रवादीच्या विलिनीकरण झाले असते, तर छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठवण्यात येणार होते, असा दावा खासदार अमोल कोल्हे यांनी केला, तर या आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत दुसराच दावा केला. राज्यसभेवर कुणाला पाठवायचे हे दादांनी मनात पक्कं केलं होतं, याविषयीचा खुलासा रोहित पवारांनी केला. Sharad Pawar

    रोहित पवारांची तिसरी पत्रकार परिषद

    अजितदादांचा विमान अपघात की घातपात याविषयीवर रोहित पवार यांनी तिसरी पत्रकार परिषद नवी दिल्लीत घेतली. अपघातानंतर काही पुरावे सादर करत त्यांनी याविषयीचा मोठा दावा केला आहे. वैमानिकाचा वापर करून हा अपघात घडवून आणल्याची शंका त्यांनी व्यक्त केली, तर त्यांनी पुन्हा एकदा केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

    – तेलुगू देशम – व्हीएसआर कंपनीचे संबंध

    तेलगू देसमचे नेते आणि व्हीएसआर कंपनीच्या मालकाचे घनिष्ठ संबंध असल्याने तपास निष्पक्ष होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. आज त्यांनी काही खुलासे आणि पुरावे समोर आणतानाच अजितदादांच्या एक्झिटमागे घातपाताची शंका व्यक्त केली.


    AI फॉर एग्रीकल्चर वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा AI इंडिया समिटमध्ये विशेष संवाद!!; महाराष्ट्राचे मॉडेल स्वीकारले संपूर्ण देशाने!!


    – शरद पवारांच्या नावाचा विचार

    पण रोहित पवार यांनी वेगळाच दावा केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा विचार होता. विलिनीकरणाबाबत शरद पवार यांनी कुठलीही अट घातली नव्हती. दादांसाठी दोन्ही पक्ष एकत्र यावेत हा राजकीय प्रश्न नव्हता, तर भावनिक प्रश्न होता. शरद पवारांनी राज्यसभेवर जावे, अशी अजितदादांनी इच्छा व्यक्त केली होती, असा मोठा दावा रोहित पवार यांनी केला. त्यामुळे छगन भुजबळ यांना राज्यसभेवर पाठविण्याचा अमोल कोल्हे यांच्या दाव्याला त्यांनी छेद दिला.

    – छगन भुजबळ कशासाठी??

    दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार होते, असे अजितदादांन आम्हाला सांगितले होते, असा दावा अमोल कोल्हे यांनी केला होता. भुजबळ हे मोठे नेते आहेत, त्यामुळे मी त्यांचा त्रागा समजू शकतो. कारण जी काही आधी चर्चा झाली होती. विशिष्ट जातीनिहाय जनगणना होत असताना ओबीसींचा कॉलम जातनिहाय जनगणनेमध्ये नाही, अशा परिस्थितीत भुजबळ यांच्या सारखा एक वरिष्ठ नेता संसदेत असणं ही फार महत्त्वाची गोष्टी होती. या संदर्भात अजित पवार यांच्याशी आमची प्राथमिक चर्चा झाली होती, असा दावा खासदार अमोल कोल्हे यांनी केला. पण शरद पवारांचे नाव पुढे करून रोहित पवारांनी अमोल कोल्हे यांच्या दाव्याला छेद दिला.

    Conflicting claims from Sharad Pawar’s NCP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Khalistani : पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यापूर्वी लिहिले खलिस्तानी नारे; दहशतवाद्याने ट्रेनमधील व्हिडिओ जारी केला; खालडांचा उल्लेख

    West Bengal : बंगालमध्ये 20 वर्षांनंतर टाटाचे पुनरागमन शक्य:CM सुवेंदू स्वतः करणार प्रकरणाची चौकशी; ममतांच्या आंदोलनामुळे बंद पडला होता प्लांट

    Vietnam Boat : व्हिएतनाममध्ये बोट उलटली, 15 भारतीयांचा मृत्यू:32 भारतीय प्रवासी होते, यातील बहुतांश पर्यटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील होते