• Download App
    प्रशांत किशोर यांनी अखेर मान्य केली भाजपाची ताकद, म्हणाले पश्चिम बंगालच्या राजकारणातून भाजपला वगळणे अशक्य|Prashant Kishor finally acknowledged the strength of the BJP, saying it was impossible to exclude the BJP from West Bengal politics

    प्रशांत किशोर यांनी अखेर मान्य केली भाजपाची ताकद, म्हणाले पश्चिम बंगालच्या राजकारणातून भाजपला वगळणे अशक्य

    • पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला शंभरपेक्षाही जास्त जागा मिळणार नाहीत यासाठी स्वत:चे करीअर रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पणाला लावले होते. परंतु, निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यापर्यंत येताना त्यांनी अखेर भाजपाची ताकद मान्य केली आहे.Prashant Kishor finally acknowledged the strength of the BJP, saying it was impossible to exclude the BJP from West Bengal politics
    • पश्चिम बंगालच्या राजकारणात भाजप ताकद बनली असून त्यांना कमी लेखून चालणार नाही असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालमध्ये लोकप्रिय असल्याचेही त्यांनी सांगितले.

    विशेष प्रतिनिधी 

    कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाला शंभरपेक्षाही जास्त जागा मिळणार नाहीत यासाठी स्वत:चे करीअर रणनितीकार प्रशांत किशोर यांनी पणाला लावले होते. परंतु, निवडणुकीच्या तिसºया टप्यापर्यंत येताना त्यांनी अखेर भाजपाची ताकद मान्य केली आहे.

    पश्चिम बंगालच्या राजकारणात भाजप ताकद बनली असून त्यांना कमी लेखून चालणार नाही असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम बंगालमध्ये लोकप्रिय असल्याचेही त्यांनी सांगितले.



    प्रशांत किशोर म्हणाले, भाजपाला कमी लेखण्याची चूक करू नको. आता पश्चिम बंगालमध्ये भाजप मोठी राजकीय ताकद बनली आहे यामध्ये दुमत नाही. मात्र, हे सगळे असले तरी भाजपा शंभरपेक्षा जास्त जागा मिळवू शकणार नाही. तृणमूल कॉँग्रेसच पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळविणार आहे.

    पश्चिम बंगालमध्ये भाजपाला पाय ठेवण्यासाठीही जागा नाही असे म्हणत शंभरपेक्षा जास्त जागा मिळाल्या तर आपला रणनितीकार म्हणून व्यवसाय बंद करू असे प्रशांत किशोर यांनी म्हटले होते. परंतु, त्यानंतर क्लबहाऊस चॅट नावाने ओळखल्या

    जाणाऱ्या एका चर्चेत पत्रकारांशी बोलताना पश्चिम बंगालमध्ये भाजपाच जिंकणार असे प्रशांत किशोर म्हणाले होते. त्याचा व्हिडीओही व्हायरल झाला होता. मात्र, या विधानाचा इन्कार न करता संपूर्ण व्हिडीओ ऐका असे प्रशांत किशोर म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी तृणमूल कॉँग्रेसच विजय मिळविणार याचा पुनरुच्चार केला आहे.

    प्रशांत किशोर म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या बाजुने एकच गोष्ट आहे ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये अत्यंत चुरशीची निवडणूक होणार आहे. मात्र, भाजपाला त्यांच्या बालेकिल्यातही तृणमूल कॉँग्रेससोबत झुंजावे लागणार आहे.

    पश्चिम बंगालमध्ये विविध वाहिन्यांनी केलेल्या निवडणूक सर्वेक्षणात भाजपाला पसंती मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यावर स्पष्टीकरण देताना प्रशांत किशोर म्हणाले, सुरूवातीच्या टप्यांमध्ये झालेल्या भागात भाजपाची स्थिती मजबूत आहे. त्यामुळे त्यांची हवा असल्यासारखे वाटत आहे. मात्र, पुढच्या टप्यात कृत्रिमपणे तयार केलेली ही हवा संपणार आहे.

    Prashant Kishor finally acknowledged the strength of the BJP, saying it was impossible to exclude the BJP from West Bengal politics

    Related posts

    Vande Metro Train: वंदे मेट्रो ट्रेन लवकरच सुरू होणार, प्रवाशांना मिळणार इंटरसिटीसारख्या सुविधा!

    सलमान खान गोळीबार प्रकरण: अटक केलेल्या सर्व आरोपींवर मुंबई पोलिसांनी लावले ‘MCOCA’ कलम!

    आप आमदार अमानतुल्ला यांना ईडीचे समन्स; 29 एप्रिलला कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले