• Download App
    पीकेंचा काँग्रेसला गुरुमंत्र : काँग्रेसला पुन्हा गतवैभव कसे मिळेल? प्रशांत किशोरांनी मांडला रोडमॅप, पण स्वत: काँग्रेसमध्ये जाणार की नाही, निर्णय लांबणीवर|Prashant Kishor Congress Stratergy For 2024 Elections, Sonia Gandhi Rahul Gandhi Offered Prashant Kishor To Join Party

    पीकेंचा काँग्रेसला गुरुमंत्र : काँग्रेसला पुन्हा गतवैभव कसे मिळेल? प्रशांत किशोरांनी मांडला रोडमॅप, पण स्वत: काँग्रेसमध्ये जाणार की नाही, निर्णय लांबणीवर

    काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी त्यांच्या अधिकृत निवासस्थान 10 जनपथ येथे पक्षाच्या नेत्यांची तातडीची बैठक घेतली. तब्बल 4 तास चाललेल्या या बैठकीत प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (पीके) यांनीही सहभाग घेतला. यावेळी पीके यांनी देशभरात काँग्रेसला मजबूत करण्यासाठी सविस्तर सादरीकरण केले.Prashant Kishor Congress Stratergy For 2024 Elections, Sonia Gandhi Rahul Gandhi Offered Prashant Kishor To Join Party


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी त्यांच्या अधिकृत निवासस्थान 10 जनपथ येथे पक्षाच्या नेत्यांची तातडीची बैठक घेतली. तब्बल 4 तास चाललेल्या या बैठकीत प्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (पीके) यांनीही सहभाग घेतला. यावेळी पीके यांनी देशभरात काँग्रेसला मजबूत करण्यासाठी सविस्तर सादरीकरण केले. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे.

    काय आहे पीकेंच्या सादरीकरणात?

    पीके यांनी आपल्या सादरीकरणात 2024 च्या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याचा रोडमॅप सांगितला. सूत्रांच्या माहितीनुसार, पीके म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने केवळ 370 जागांवर लक्ष केंद्रित करावे. देशभरात लोकसभेच्या एकूण 543 जागा आहेत. पीके यांनी केलेली आणखी एक सूचना म्हणजे जिथे काँग्रेस कमकुवत आहे तिथे ड्रायव्हिंग सीट मजबूत मित्रपक्षाला द्या आणि एकत्र निवडणुका लढवा.



    काँग्रेसने समिती केली स्थापन, आठवडाभरात निर्णय

    काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, बैठकीत पीके यांनी 2024 बाबत सादरीकरण केले आहे. काँग्रेस अध्यक्षांनी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ही समिती आठवडाभरात अहवाल सादर करणार आहे. समितीच्या अहवालाच्या आधारे काँग्रेस पुढे काम करेल. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी पीके यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.

    10 हून अधिक नेते सहभागी

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्षांच्या निवासस्थानी पक्षाच्या 10 हून अधिक नेत्यांना बोलावण्यात आले आहे. त्यामध्ये राहुल गांधी, प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल, जयराम रमेश, एके अँटनी, दिग्विजय सिंग, अजय माकन, अंबिका सोनी, मुकुल वासनिक, पी. चिदंबरम आणि रणदीप सुरजेवाला यांचा समावेश होता.

    हार्दिक पटेल यांचा काँग्रेस हायकमांडवर गंभीर आरोप

    बुधवारी गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी हायकमांडवर निर्णय घेण्यास असमर्थ असल्याचा आरोप केला. मी राहुल गांधींना अनेकदा सांगितले, पण काँग्रेस हायकमांड कोणताही निर्णय घेऊ शकत नाही, असे हार्दिक यांनी म्हटले होते. पाटीदार नेते नरेश पटेल यांचा काँग्रेसमध्ये समावेश न केल्याने हार्दिक यांनी नाराजी व्यक्त केली होती.

    Prashant Kishor Congress Stratergy For 2024 Elections, Sonia Gandhi Rahul Gandhi Offered Prashant Kishor To Join Party

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य