विशेष प्रतिनिधी
प्रयागराज – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांचा मृत्यू श्वा स कोंडून झाला असल्याचा निष्कर्ष शवविच्छेदन अहवालात नोंदविला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर व्हिसेरा राखून ठेवला आहे. या प्रकरणी अटकेत असलेला मुख्य संशयित आरोपी आनंद गिरी व आद्या प्रसाद तिवारी यांना प्रयागराज न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.Postmortem report of Mahant submitted to govt.
पाच डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केले. त्याचा अहवाल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे सीलबंद लिफाफ्यात सोपविण्यात आला. अहवालातील माहितीनुसार श्वा स कोंडल्याने गिरी यांचा मृत्यू झाला. गुदमरल्याने त्यांच्या गळ्यावर ‘व्ही’ असे निशाण उमटल्याची नोंदही असल्याचे सांगण्यात येत आहे.
महंतांच्या संशयित मृत्यूसंदर्भातील तपासात शवविच्छेदनाचा अहवाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याच्याच आधारावर एसआयटी चौकशी करणार आहे.‘एसआयटी’ने आनंद गिरी व बडे हनुमान मंदिराचा मुख्य पुजारी आद्या प्रसाद तिवारी यांची अनेक तास चौकशी केली.
नरेंद्र गिरी यांनी मृत्यूआधी लिहिलेल्या चिठ्ठीत मुलगी किंवा महिलेबरोबर व्हिडिओ तयार केल्याच उल्लेख केला आहे. मात्र चौकशीत आनंद गिरीने ही बाब फेटाळून लावली. चिठ्ठीत त्यांचा शिष्य आनंद गिरीसह आद्या प्रसाद तिवारी व त्याचा मुलगा संदीप तिवारी याचाही उल्लेख आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App