• Download App
    Muslim League काँग्रेसची मुस्लिम लीग झाल्याचा मिळाला राजकीय पुरावा; ८० % मुस्लिम उमेदवार निवडून आल्याचा वाचा आकडा!!

    काँग्रेसची मुस्लिम लीग झाल्याचा मिळाला राजकीय पुरावा; ८० % मुस्लिम उमेदवार निवडून आल्याचा वाचा आकडा!!

    नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या काही वर्षांमध्ये काँग्रेसवर माओवादी मुस्लिम लीगी विचारसरणी स्वीकारल्याचा आरोप केला. पण तो आरोप आता केवळ राजकीय न राहता त्याला प्रत्यक्ष आकडेवारीची जोड मिळाल्याचे निवडणुकीच्या निकालामधून उघड झाले. Muslim League

    पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुदूचेरी आणि केरळ मधल्या निवडणुकीत काँग्रेसने इतर कुठल्याही पक्षापेक्षा जास्त मुस्लिम उमेदवार दिले आणि त्यापैकी 80 % मुस्लिम उमेदवार निवडून आल्याचे आकडेवारीतूनच उघड झाले. काँग्रेसने या पाचही राज्यांमध्ये जातीय समीकरणांचा आधार घेत उमेदवार उभे केले. पण त्यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम उमेदवारांना प्राधान्य दिले होते.

    आसाम मध्ये काँग्रेसच्या 19 आमदारांपैकी 18 मुस्लिम

    विशेषत: आसाम आणि केरळमध्ये काँग्रेसचे राजकीय वास्तव जास्त प्रकर्षाने उघडकीस आले. आसाम मध्ये काँग्रेसने 101 उमेदवार उभे केले होते. पण त्यांचे फक्त २० उमेदवार निवडून येऊ शकले. लोकसभेतले उपनेते गौरव गोगोई सुद्धा निवडणुकीत पडले. पण काँग्रेसचे 19 उमेदवार निवडून आले, त्यापैकी 18 उमेदवार मुस्लिम निघाले. याचा अर्थ काँग्रेसचे आसाम मध्ये काँग्रेसच्या 20 आमदारांपैकी 18 आमदार मुस्लिम असतील. या सगळ्यांना काँग्रेसने मुस्लिम बहुल इलाख्यांमध्ये तिकिटे दिली होती. काँग्रेसच्या मुस्लिम आमदारांनी बद्रुद्दिन अजमल यांच्या इंडियन डेमोक्रॅटिक फ्रंट च्या उमेदवारांना पाडले. पण काँग्रेसला हिंदू इलाख्यामध्ये आपले कुठलेच अस्तित्व टिकवून ठेवता आले नाही. काँग्रेसच्या 79 हिंदू उमेदवारांपैकी फक्त एक उमेदवार निवडून आला. त्यामुळे बद्रुद्दिन अजमल यांनी काँग्रेसवर जोरदार आगपागड केली. काँग्रेसने आमचे उमेदवार पाडण्यासाठी जास्तीत जास्त मुस्लिम उमेदवार दिले त्यामुळे आमचे उमेदवार पडले पण काँग्रेसला स्वतःचे धर्मनिरपेक्ष स्वरूप टिकवून ठेवता आले नाही. काँग्रेसच मुस्लिम लीग बनली म्हणून त्या पक्षाचे मुस्लिम उमेदवार जास्त निवडून आले, अशी मखलाशी बद्रुद्दीन अजमल यांनी केली.



    केरळात 35 मुस्लिम आमदारांपैकी 30 काँग्रेस आघाडीचे

    केरळ विधानसभा निवडणुकीमध्ये 35 मुस्लिम उमेदवारांना विजय मिळाला यापैकी 22 मुस्लिम उमेदवार इंडियन युनियन मुस्लिम लीगचे असल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसचे आठ मुस्लिम उमेदवार निवडून आले, तर कम्युनिस्ट पार्टीचे तीन मुस्लिम उमेदवार विजयी झाले. केरळमध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांची युती होती. त्यामुळे मुस्लिम लीगच्या मतांचा काँग्रेसला फायदा झाला आणि काँग्रेसच्या मतांचा मुस्लिम लीगला फायदा झाला. पण केरळ मधले काँग्रेसचे नेते आणि राहुल गांधी हे भाजप आणि कम्युनिस्ट यांना एकमेकांच्या ए टीम आणि बी टीम म्हणत होते. पण प्रत्यक्षात काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांनीच एकमेकांच्या ए टीम आणि बी टीम म्हणून काम केले. हे आकडेवारीनिशी सिद्ध झाले.

    बंगाल आणि तामिळनाडूतही तीच परिस्थिती

    पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेसने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेस पेक्षा जास्त मुस्लिम उमेदवार उभे केले होते. काँग्रेसने 63 मुस्लिम उमेदवार उभे केले होते, तर तृणमूळ काँग्रेसने 47 मुस्लिम उमेदवार उभे केले होते. पश्चिम बंगाल मध्ये काँग्रेसचे दोनच आमदार निवडून आले, ते दोन्ही मुस्लिमच निघाले.

    तामिळनाडू मध्ये काँग्रेसचे दोनच आमदार निवडून आले, त्यापैकी एक आमदार मुस्लिम निघाला. म्हणजेच काँग्रेसला मुस्लिम बहुल इलाख्यामध्ये तुलनेने चांगला प्रतिसाद मिळाला, पण म्हणूनच हिंदू बहुल इलाख्यात काँग्रेसला प्रचंड मार खावा लागला.

    Political Proof Emerges That the Congress Has Transformed into the Muslim League

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Vijay Factor : दक्षिणेतील ‘विजय फॅक्टर’ आणि सत्ताविरोधी लाट; तेलंगणातही नव्या राजकारणाची चाहूल!

    काँग्रेसची मुस्लिम लीग झाल्याचा मिळाला राजकीय पुरावा; ८० % मुस्लिम उमेदवार निवडून आल्याचा वाचा आकडा!!

    Kerala : केरलममध्ये मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी काँग्रेसमध्ये महाभारत, वेणुगोपाल, सतीशन की चेन्निथला, कुणाला मिळणार सत्तेची चावी?