राजकीय चर्चा नोटांभोवती, पण ATM मधून खेळण्यातील नोट!!

प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर महात्मा गांधी यांच्याबरोबर लक्ष्मी आणि गणेशाची गणेशाच्या प्रतिमा छापाव्यात, अशी मागणी केल्याबरोबर देशभरातली सगळी राजकीय चर्चा नोटांभोवती फिरायला लागली. प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांना अरविंद केजरीवाल्यांच्या मागणीवर काही ना काही मत व्यक्त करणे भागच पडले. त्यातून कोणाची सुटकाच होऊ शकली नाही. Political discussions around the notes, however
A toy note from an ATM

पण एकीकडे राजकीय चर्चा अशी नोटांभोवती फिरायला लागली असताना दुसरीकडे उत्तर प्रदेशातील अमेठी शहरातील इंडिया वन एटीएममधून सोमवारी संध्याकाळी 200 रुपयांची खेळण्यातील बनावट नोट बाहेर आल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यावर खळबळ उडाली. या नोटेवर Full Of Fun असे लिहिलेले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा प्रकार अमेठी शहरातील इंडिया वन एटीएममधला आहे. जिथे सोमवारी संध्याकाळी एटीएममधून पैसे काढण्यासाठी लोकांची रांग लागली होती. यावेळी एका व्यक्तीला एटीएममधून मूळ नोटेसह 200 रुपयांची बनावट नोट मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. काही वेळातच तिथे गर्दी जमली. लोकांनी याची माहिती अमेठी पोलिसांना दिली. या घटनेचा व्हिडिओ एका सोशल मीडिया वापरकर्त्याने शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

एकूण काय… दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नोटांची चर्चा जोरात आहे मग त्यावर फोटो कोणाचे हवेत यावरची चर्चा असो अथवा खेळण्यातल्या नोटांची चर्चा असो… नोट सध्या जोरात आहे!!

Political discussions around the notes, however A toy note from an ATM

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात