अपघातग्रस्त विमानात 242 प्रवासी, 169 भारतीय, 3 महाराष्ट्रीय, 53 ब्रिटीश नागरिक, 11 लहान मुलांचा समावेश; हेल्पलाइन नंबर जारी

Ahmedabad plane crash.

वृत्तसंस्था

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये तब्बल 242 प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळलं. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील मेघानी नगर परिसरात झालेल्या विमान दुर्घटनेत मोठी मनुष्यहानी झाली. या विमानातून तब्बल 242 प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये, 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर होते.

विशेष म्हणजे या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही प्रवास करत होते. विमानातील एकूण 242 प्रवाशांमध्ये, 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटीश नागरिक, पोर्तुगालचे 7 आणि कॅनडाचा एक नागरिक प्रवास करत होते, अशी माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत सर्वच प्रवासी मृत्युमुख पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी घटनास्थळावर धाव घेतली. या दुर्घटनेनं अवघा देश शोकसागरात बुडाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन शोक व्यक्त केला. अहमदाबाद पोलीस आणि अन्य संस्थांनी हेल्पलाईन नंबर जारी केलेत.

अहमदाबादमध्ये तब्बल 242 प्रवाशांना घेऊन जाणारं प्रवासी विमान अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात कोसळलं आहे. एअर इंडियाच्या ह्या विमानाने अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण केले होते. मात्र, दुपारी 1.31 वाजता केलेल्या उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांतच विमान खाली कोसळलं. या विमानातील 242 प्रवाशांमध्ये 12 क्रू मेंबर, 2 नवजात बाळ, 11 लहान मुले, 217 प्रौढ प्रवासी प्रवास करत होते. त्यामध्ये, 169 भारतीय, 53 ब्रिटीश नागरिक, पोर्तुगालचे 7 आणि कॅनडाचा एक नागरिक होता. त्यामुळे, या दुर्घटनेनंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनीही ट्विट करुन शोक व्यक्त केला आहे. विमानातील 12 क्रू मेंबर्सपैकी 1 क्रू मेंबर महाराष्ट्राची नागरिक होती.

त्यानंतर, काही वेळातच 3 अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सध्या, एनडीआरएफचे पथक आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. विमानातील प्रवाशांची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र, या विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते हे समोर आलेल्या बोर्डिंग पासमधून स्पष्ट झालं आहे. विमान दुर्घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन करुन माहिती घेतली, तसेच सर्वोतोपरी मदतीचे आश्वासनही दिले.

मेडीकल कॉलेजवर कोसळलं विमान

विशेष म्हणजे विमानाचा अपघात इतका भयंकर होता की, अहमदाबादच्या बे.जे. मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर हे विमान कोसळलं असून तेथील हॉस्टेलवर जेवण करणाऱ्या भावी डॉक्टरांना भरल्या ताटावरुन उठवण्याचं काम ह्या दुर्घटनेनं केलं. या दुर्घटनेचे काही फोटो समोर आले असून पोटात कालवणारी, अत्यंत ह्रदयद्रावक ही घटना आहे. या दुर्घटनेत येथील 45 डॉक्टर जखमी झाल्याची माहिती आहे.

ब्रिटनच्या पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याकडून देखील एअर इंडिया दुर्घटनेसंदर्भात ट्विट करण्यात आलं आहे. लंडनकडे जाणाऱ्या आणि अनेक ब्रिटिश नागरिकांसह अहमदाबादमध्ये अपघातग्रस्त झालेल्या विमानाचे फोटो आणि व्हिडिओ पाहून मला धक्का बसला आहे. या विमानात ब्रिटनचे 53 नागरिक प्रवास करत होते. सर्व प्रवाशांसोबत माझ्या सहवेदना असून परिस्थितीवर मी लक्ष ठेऊन आहे, अपडेट घेत आहे, असेही पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी म्हटलं.

police emergency services and information regarding the Ahmedabad plane crash.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात