पाटण्यात भाजपच्या मोर्चावर पोलिसांकडून लाठीचार्ज; पाण्याचा मारा अन् अश्रूधुराचाही करण्यात आला वापर


पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आल्याने अनेक भाजपा कार्यकर्ते जखमीही झाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे भाजपच्या निदर्शनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये अनेक जण जखमी झाले आहेत. पाटण्यात गुरुवारी भाजपचे कार्यकर्ते आणि नेते सध्याच्या नितीश सरकारच्या निषेधार्थ मोर्चा काढत होते. Police baton charge at BJP march in Patna Water cannon and tear gas were also used

आंदोलकांना आंदोलनस्थळावरून हटवण्यासाठी आणि त्यांना विधानसभेचा घेराव घालण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या मारा आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर केला. राज्यात शिक्षकांच्या नियुक्तीच्या मुद्द्यावरून भाजप कार्यकर्ते बिहार सरकारच्या विरोधात विधानसभेवर मोर्चा काढत होते.

शिक्षकांना नियुक्तीपत्रे मिळण्यास होणारा विलंब, राज्यात सुरू असलेला भ्रष्टाचार आणि इतर मुद्द्यांवर गुरुवारी भाजपने बिहारमध्ये मोर्चा काढला. भाजप नेते व कार्यकर्ते गांधी मैदान ते विधानसभेपर्यंत पदयात्रा काढत होते. दरम्यान, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना व नेत्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.

पाटण्यातील भाजपच्या या मोर्चात भाजपचे अनेक खासदार आणि आमदारही सहभागी झाले होते. राज्यसभा खासदार राकेश सिन्हा, बिहार भाजप अध्यक्ष सम्राट चौधरी यांच्यासह अनेक आमदारही या मोर्चात सहभागी झाले होते. बिहारमधील भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांवरील लाठीचार्ज हे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या दडपशाही धोरणाचे उदाहरण असल्याचे म्हटले आहे.

Police baton charge at BJP march in Patna Water cannon and tear gas were also used

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात