• Download App
    PM Narendra Modi पेट्रोल - डिझेलचे भाव वाढले म्हणून विरोधकांचा आरडाओरडा; मोदींचे UAE मध्ये जाऊन पेट्रोलियम साठ्यांसंदर्भात करार!!

    पेट्रोल – डिझेलचे भाव वाढले म्हणून विरोधकांचा आरडाओरडा; मोदींचे UAE मध्ये जाऊन पेट्रोलियम साठ्यांसंदर्भात करार!!

    नाशिक : पश्चिम आशियातल्या इराणा आणि अमेरिका युद्धाचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसल्यानंतर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये आज प्रत्येकी तीन रुपयांनी वाढ केली. त्याबरोबर विरोधकांनी बोंबाबोंब सुरू केली. केंद्र सरकार जोपर्यंत अर्थव्यवस्थेवरचा दबाव सहन करत होते, तोपर्यंत विरोधकांनी अर्थव्यवस्थेच्या आरोग्याबाबत चकार शब्द काढला नव्हता. पण केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये प्रत्येकी तीन रुपयांनी वाढ केल्याबरोबर विरोधकांनी आरडाओरडा केला.

    या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संयुक्त अरब अमिराती UAE मध्ये जाऊन भारत आणि अमीरात यांच्यात पेट्रोलियम पदार्थांच्या पुरवठ्या संदर्भात करार केले. त्यामुळे भारताला पेट्रोलियम पदार्थ मिळण्याचा पर्यायी मार्ग अधिक वेगाने आणि अधिक सक्षमतेने खुला झाला.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) अल्पकालीन दौऱ्यामुळे भारताला मोठा फायदा झाला. आज जाहीर झालेले प्रमुख करार आणि गुंतवणुकीचे निर्णय पुढील प्रमाणे :

    •  भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील सामरिक – संरक्षण भागीदारीच्या आराखड्यावरील करार
    •  सामरिक पेट्रोलियम साठ्यांवरील सामंजस्य करार
    •  द्रवरूप पेट्रोलियम वायूच्या (LPG) पुरवठ्यावरील करार
    •  वडिनार येथे जहाज दुरुस्ती क्लस्टर स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार
    •  भारतीय पायाभूत सुविधा, आरबीएल बँक आणि सन्मान कॅपिटलमध्ये ५ अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा

    या महत्त्वपूर्ण करारांमुळे भारताचे इराणच्या तेलावर आणि रशियाच्या तेलावर असलेले अवलंबित्व कमी होऊन UAE मधून पेट्रोलियम पदार्थांचा आणि अन्य इंधनाचा पुरवठा वाढणार आहे. त्यामुळे भारतासाठी इंधनपुरवठ्याची साखळी अधिक सक्षम आणि अधिक वेगाने होऊ शकणार आहे.

    PM Narendra Modi and UAE President Sheikh Mohammed bin Zayed Al Nahyan.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi’ : राहुल गांधींवर उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्तेचा आरोप; अलाहाबाद HCचे CBI-EDला चौकशीचे निर्देश

    Wholesale : घाऊक महागाई 43 महिन्यांत सर्वाधिक; एप्रिलमध्ये 8.30% वर पोहोचली, रोजच्या गरजेच्या वस्तू आणि इंधन-ऊर्जेचे दर वाढले

    Swarana Kanta Sharma : दिल्ली हायकोर्टाच्या न्यायमूर्ती स्वर्णकांता यांनी मद्य धोरण प्रकरण सोडले; म्हणाल्या- केजरीवालांसह आपच्या नेत्यांवर अवमाननेची कारवाई करणार