वृत्तसंस्था
नवी दिल्ली : PM Modi पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन देशातील कच्चे तेल, गॅस, पेट्रोलियम उत्पादने, वीज व खतांच्या स्थितीचा आढावा घेतला. युद्धाच्या आडून जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा काळाबाजार होता कामा नये, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले. घबराटीची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी केंद्र व राज्यांमध्ये उत्तम समन्वयावर भर दिला.PM Modi
बैठकीत अल्पकालीन व दीर्घकालीन परिणामांचे मूल्यांकन केले. तसेतच सावरण्यासाठी तत्काळ व दूरगामी उपायांवर चर्चा झाली. वीज प्रकल्पांत पुरेसा कोळसा उपलब्ध अाहे. पंतप्रधानांनी मंत्री आणि सचिवांचा गट तयार करून ‘संपूर्ण सरकार’ या दृष्टिकोनातून काम करण्याचे निर्देश दिले. बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, कृषिमंत्री शिवराज सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, आरोग्यमंत्री जेपी नड्डा आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर उपस्थित होते.PM Modi
पुरवठा साखळीचे पर्याय
होर्मुझ मार्गातील अडथळे पाहता कच्चे तेल आणि खरीप हंगामासाठी खतांचे पर्यायी स्रोत शोधण्यावर चर्चा झाली. सरकारने केमिकल, फार्मा आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रासाठी आयातीचे नवे पर्याय आणि भारतीय उत्पादनांसाठी नवीन बाजारपेठा विकसित करण्यावर भर दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App