• Download App
    आता वैमानिकांचाही काम बंद आंदोलनाचा इशारा, एअर इंडियाला शेवटचा अल्टिमेटम|Pilots threatened to stop working, last ultimatum to Air India

    आता वैमानिकांचाही काम बंद आंदोलनाचा इशारा, एअर इंडियाला शेवटचा अल्टिमेटम

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. आता वैमानिकांनीही काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. वारंवार विनंती करूनही वैमानिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने एअर इंडियाच्या वैमानिकांनी कंपनीला शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. मागण्या मान्य करा; अन्यथा कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.Pilots threatened to stop working, last ultimatum to Air India

    वैमानिकांच्या संघटनांनी यासंदर्भात विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल यांना पत्र लिहून मागण्या मांडल्या आहेत. कोरोनाकाळात सर्वच विमान कंपन्यांनी वेतनकपात लागू केली; परंतु हवाई वाहतुकीत सुधारणा झाल्यानंतर खासगी कंपन्यांनी त्यांच्या वैमानिकांना पूर्ण वेतन देण्यास सुरुवात केली.



    एअर इंडियाने मात्र अद्यापही कपात थांबविलेली नाही. त्यामुळे ५५ टक्के कपातीचा भार सहन करावा लागत आहे. वेतन पूर्ववत करण्यासंदर्भात वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतरही एअर इंडियाच्या व्यवस्थापनाकडून दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे कामबंद केल्याशिवाय आमच्यासमोर कोणताही पर्याय उरलेला नाही, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

    कंपनीने बेकायदेशीरपणे ५५ टक्के वेतनकपात लागू केली आहे. ती तत्काळ मागे घेण्यात यावी. वैमानिकांची व्याजासह रोखलेली २५ टक्के थकबाकी, ग्रॅच्युइटीचे विवरण, रजा रोखीकरणाचा पर्याय, सर्व कायम कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय लाभ, रोखलेल्या लेओव्हर भत्त्यावर कर सवलत लागू करावी, अशी मागणी केली.

    Pilots threatened to stop working, last ultimatum to Air India

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    West Bengal : बंगालमध्ये OBC आरक्षण 17% वरून 7%; ममता सरकारची OBC-A आणि OBC-B व्यवस्था रद्द

    One Nation, One Election : वन नेशन, वन इलेक्शन- JPC ची टीम गुजरातमध्ये; प्रियंका गांधी यांच्यासह 39 सदस्य सर्व पक्षांच्या नेत्यांची भेट घेणार

    CJI Surya Kant : CJI सूर्यकांत म्हणाले- शांततापूर्ण विरोधाचा अधिकार; पण रस्ता अडवून लोकांना त्रास देऊ शकत नाही