Air India : एअर इंडियाचे विमान पाक हवाई हद्दीत घुसले; दिल्लीहून अमृतसरसाठी उड्डाण, तांत्रिक बिघाडामुळे मार्ग चुकला, पाकिस्तानने इशारा देऊन परत पाठवले
एअर इंडियाचे एक विमान सोमवारी रात्री मार्ग भरकटून पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात घुसले. पाकिस्तानच्या हवाई वाहतूक प्राधिकरणाने (Air Traffic Authority) त्याला इशारा देऊन परत पाठवले. विमानाने दिल्लीतून उड्डाण केले होते आणि ते अमृतसरला उतरणार होते.