Air India : लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान माघारी फिरवले; जाणून घ्या कारण?
मुंबईहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान परत बोलावले आहे. फ्लाइटराडार 24 नुसार, एअर इंडियाचे विमान AIC129 आज सकाळी मुंबईहून लंडनच्या दिशेने निघाले होते. परंतु उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान मुंबईला परत बोलावले गेले आहे. असे सांगण्यात येत आहे की इराण व इस्रायलमधील संघर्ष लक्षात घेता, एअर इंडियाने हे विमान परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच अनेक विमानांचा मार्गही वळवण्यात आला आहे.