विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. २२ मार्चपासून तब्बल नऊ वेळा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. मागील ९ दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलिटर ५ रुपये ६० पैशांनी वाढले. आज पुन्हा त्यात भर पडली. Petrol and diesel prices have gone up nine times since March 22
आज पेट्रोलच्या दरात ८० ते ८४ पैशांनी वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरातही ७६ ते ८० पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दरात ८० पैशांनी वाढ झाली असून डिझेलच्या दरातही ८०पैशांनी वाढ झाली आहे.
मुंबईत पेट्रोलच्या दरात ८४ पैशांनी तर डिझेलच्या दरात ८४ पैशांनी वाढ झाली आहे. कोलकातामध्ये पेट्रोलच्या दरात ८३ पैशांनी, तर डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे चेन्नईमध्ये पेट्रोलच्या दरात ७६ पैशांनी, डिझेलच्या दरात ७६ पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ४ नोव्हेंबर नंतर किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.
पाच राज्यांतील निवडणुकांमुळे मोदी सरकारने तेल कंपन्यांना किमती वाढवण्यापासून रोखल्याचा आरोप सरकारच्या राजकीय विरोधकांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ११२ डॉलरवर पोहोचल्यानंतर तेल कंपन्यांनी रविवारी डिझेलच्या मोठ्या खरेदीदारांसाठी प्रति लिटर २५ रुपयांनी वाढ केली. हळूहळू किरकोळ दरात वाढ केली जाईल, असे तेल विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
या राज्यांमध्ये पेट्रोलची किंमत १०० रुपयांच्या पुढे आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांवर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.
तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहेत ते जाणून घ्या, तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL वेबसाइटवरून मिळेल.
Petrol and diesel prices have gone up nine times since March 22
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिकेत पोलखोल अभियान राबवून भाजप काढणार शिवसेनेचे वाभाडे
- Weather Update : राज्यात पुढचे 5 दिवस उष्णतेची लाट, मराठवाडा-विदर्भासह उत्तर-मध्य महाराष्ट्र तापणार, IMDचा सावधगिरीचा इशारा
- Jammu Kashmir Elections : जम्मू-काश्मिरात कधी होणार निवडणुका? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत दिले उत्तर, वाचा सविस्तर…
- Axis-City Bank Deal : ऑक्सिस बँक भारतातील सिटी बँकेचा व्यवसाय सांभाळणार, १.६ अब्ज डॉलरमध्ये झाला करार