• Download App
    देशात विजपुरवठ्यात कोणतीही तूट नाही; केंद्रीय उर्जामंत्रालयाचे स्पष्टीकरण; १३ वर्षातील त्रुटी दूर । Peak power deficit in India almost wiped out, says power ministry :The statement was in response to a tweet sent out by the All India Mahila Congress

    देशात विजपुरवठ्यात कोणतीही तूट नाही; केंद्रीय उर्जामंत्रालयाचे स्पष्टीकरण; १३ वर्षातील त्रुटी दूर

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात विजेचा सर्वाधिक वापर होतो. तेव्हा त्यामध्ये होणारी तूट भरून काढण्यात यश आले आहे, असे केंद्रीय उर्जामंत्रालयाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे गेल्या १३ वर्षांतील पुरवठ्यात होणाऱ्या त्रुटी देखील भरून काढल्या आहेत. Peak power deficit in India almost wiped out, says power ministry :The statement was in response to a tweet sent out by the All India Mahila Congress

    उर्जा मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतातील पीक पॉवर तूट जवळपास मिटली आहे. याबाबत अखिल भारतीय महिला काँग्रेसने पाठवलेल्या ट्विटला उर्जामंत्रालयाने उत्तर दिले होते.भारतीय महिला काँग्रेसनेदावा केला होता की भारतात ऑक्टोबरमध्ये १२०१ दशलक्ष युनिट्सचा वीजेचा तुटवडा होता. तो दावा उर्जामंत्रालयाने फेटाळून लावला आहे.



    गेल्या तेरा वर्षात १६.२ टक्क्यांनी विजेची तूट होती. ती आता भरून काढली असल्याने आता कोणतीही समस्या उरलेली नाही. २००७-०८ पासूनचा तपशील देताना, मंत्रालयाने सांगितले की २००७-०८ मध्ये १६.६ % आणि २००१-२०१२ मध्ये १०.०६% आणि २०२०-२१ मध्ये विजेची तूट ०.४ % होती. ही तूट भरून काढण्यात सरकारला यश आले आहे. त्यामुळे विजेचा सर्वाधिक वापर होत असताना विजपुरवठ्यात कोणतेही अडथळे येत नाहीत.

    Peak power deficit in India almost wiped out, says power ministry :The statement was in response to a tweet sent out by the All India Mahila Congress

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    गुजरात-राजस्थानमध्ये सुरू होते ड्रग्जचे रॅकेट ATS-NCBने केला पर्दाफाश!

    महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खानला अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

    Vande Metro Train: वंदे मेट्रो ट्रेन लवकरच सुरू होणार, प्रवाशांना मिळणार इंटरसिटीसारख्या सुविधा!