नाशिक : लोकसभेचे एक-दोन नाही तर तब्बल पावणेतीनशे मतदार संघ वाढविण्यासाठी मोदींचा बैठकांचा सिलसिला; तर एकट्या बारामतीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पवारांची धडपड!!, हे राजकीय चित्र आज समोर आले. Pawar
– मोदींचा बैठकांचा सिलसिला
महिला आरक्षण आणि लोकसभेचे नवे परिसीमन मंजूर करून घेण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयके मांडण्यासाठी मोदी सरकारने 16 एप्रिल पासून 18 एप्रिल पर्यंत तीन दिवसांचे संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनाच्या तयारीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बैठकांचा सिलसिला सुरू केलाय. 2029 च्या लोकसभा निवडणुका नव्या परिसीमनानुसार व्हाव्यात हा यामागचा प्रमुख हेतू आहे. त्यातून लोकसभेचे तब्बल पावणे तीनशे मतदार संघ वाढून ते 816 होणार आहेत. सध्याच्या लोकसभेत 543 जागा आहेत. त्यावरून 816 होणार म्हणजेच 276 मतदारसंघ वाढणार. यापैकी लोकसभेच्या 816 पैकी 273 मतदारसंघ महिलांसाठी राखीव असणार आहेत. ही सगळी घडामोड घडवून आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेऊन बैठका लावल्यात. यातील सर्वपक्षीय बैठकीसह कायदेतज्ञांच्या बैठकीचा सुद्धा समावेश आहे. मोदी सरकारच्या राजवटीतला हा सर्वांत महत्त्वाचा निर्णय असणार आहे.
– पंतप्रधान पदाचे स्वप्न ते बारामतीसाठी धडपड
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण भारताचे राजकारण अमुलाग्र बदलून टाकणारे महत्त्वाचे पाऊल टाकत असतानाच दुसरीकडे देशाच्या राजकारणातले सगळ्यात ज्येष्ठ नेते म्हणून घेणारे शरद पवार मात्र एकट्या बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी धडपडत आहेत. शरद पवारांनी एकेकाळी पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहिले होते पण ते धुळीला मिळाल्यानंतर त्यांच्या राजकारणाची घसरण एवढी झाली की स्वतःची बारामती टिकविण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागल्या. संजय राऊत, उदय सामंत यांच्यासारख्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांबरोबर बैठका घ्याव्या लागल्या आणि तरीसुद्धा बारामतीची विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होईल याची खात्री अन्य कुठल्याही नेत्याने दिली नाही. फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीने त्या दिशेने प्रयत्न केले.
– पवारांची बिनविरोधची धडपड अयशस्वी
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून त्यांचा बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी पाठिंबा मिळविला, पण काँग्रेसचा पाठिंबा मिळवण्यात त्यांना अपयश आले. शिवाय बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही याची सुद्धा खात्री झाली कारण त्यांच्या विरोधात वेगवेगळ्या पक्षांच्या आणि अपक्ष अशा 19 उमेदवारांनी आधीच अर्ज दाखल केलाय. बारामती वर कुठल्याही पवारांची मक्तेदारी टिकवण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा पवारांविरुद्ध उमेदवार दिला नाही, तरी काँग्रेस उमेदवार देणार असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी करून बारामतीतल्या काँग्रेसला नवसंजीवनी दिली. शिवाय अन्य अपक्ष उमेदवारांनी सुद्धा बारामतीत पवारांच्या मक्तेदारीला आव्हान देऊन पवारांची बिनविरोधची धडपड अयशस्वी केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App