संसदेतील घुसखोरांचा भगतसिंगांच्या नावाचा गैरवापर; असीम सरोदेंचा वकिली ज्ञानाचा अराजकाच्या समर्थनासाठी वापर!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बेरोजगारीचा मुखवटा दाखवून संसदेत सुरक्षा भंग केलेल्या घुसखोरांनी प्रख्यात क्रांतिकारक भगतसिंग यांच्या नावाचा गैरवापर केला तर या घुसखोरांनी माजविलेल्या अराजकाच्या समर्थनासाठी प्रसिद्ध वकील असीम सरोदे आपल्या वकिली ज्ञानाचा वापर करणार आहेत.Parliament attackers misused name of Shaheed Bhagat Singh, and asim sarode will defend attacker Amol shinde



संस्कृत घुसखोरी करणाऱ्या सहा आरोपींविरुद्ध सरकारने आधीच UAPA कायद्याअंतर्गत अर्थात दहशतवाद प्रतिबंधक आणि देशद्रोह ही संबंधित कलमे लावून तपास सुरू केलाच आहे सहा आरोपींची बॅकग्राऊंड चेक करून त्यांचे वेगवेगळ्या संघटनांची संबंधही प्रस्थापित झाले आहेत देशात अराजक माजविणाऱ्या काँग्रेसी आणि डाव्या शक्तींशी त्यांचा संबंध उघड्यावर आला आहे. पण त्याच वेळी या सर्व आरोपींनी भगतसिंग फॅन क्लब तयार करून त्या मार्फत समाजात अराजक वाजवण्याचे कारस्थान रचले असेही समोर आले आहे. हे आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आले होते. त्यांनी भगतस‍िंग फॅन क्‍लब तयार केला होता. त्यानंतर दीड वर्षांपूर्वी म्हैसूरमध्ये एकत्र आले. पुन्हा 9 महिन्यांनी भेटले. त्यावेळी संसदेत घुसखोरी करुन अराजकता पसरवण्याचे कारस्थान रचले. त्यासाठी मार्च महिन्यात त्यांनी रेकी केली. मग सागर शर्मा, मनोरंजन, अमोल शिंदे, नीलम आणि ललित झा मंगळवारी रात्री गुरुग्राममध्ये विशाल शर्मा याच्या घरी थांबले. या प्रकरणाचा मास्टरमाइंड ललित झा आहे. तो संसदेच्या बाहेर अमोल शिंदे आणि नीलमचा व्हिडिओ बनवत होता. त्यानंतर त्याने हा व्हिडिओ इंस्टाग्रॅमवर अपलोड केला, तसेच सर्व आरोपींचे मोबाईल त्याच्याकडेच आहेत, असे तपासात निष्पन्न झाले.

असीम सरोदेंची पोस्ट

मात्र, एवढा मोठा कट आणि कारस्थान उघडकीस आल्यानंतर देखील प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी अमोल शिंदेला कायदेशीर मदत देण्याचे जाहीर केले आहे. अमोल शिंदेने बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी हा भगतसिंग यांचा मार्ग निवडला, तो लोकशाहीच्या दृष्टीने चुकीचा आहे, पण आपण त्याचा हेतू समजावून घेतला पाहिजे. त्याचा हेतू कोणत्याही खासदाराला इजा पोहोचवण्याचा नव्हता हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आपण त्याला कायदेशीर मदत देणार आहोत. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. त्यामुळे त्याला सकारात्मक शिक्षा व्हावी, अशी पोस्ट असीम सरोदे यांनी लिहिली आहे.

मास्टर माईंड ललित झा व्हिडिओ बनवून फरार

अमोल शिंदे आणि नीलम यांनी संसदेच्या बाहेर गोंधळ सुरु केला. त्यावेळी ललित झा हा त्यांचा व्हिडिओ बनवत होतो. सिग्नल अ‍ॅपच्या माध्यमातून हे एकामेकांच्या संपर्कात होते. गोंधळ सुरु होताच ललित सर्वांचे मोबाईल घेऊन फरार झाला. ललितकडे नीलम, अमोल, सागर आणि मनोरंजनचे मोबाईल फोन आहे. पोलीस ललितचा आणि इतर आरोपींच्या मोबाईलचा शोध घेत आहेत.

नीलम आझाद ही हरियाणामध्ये काँग्रेसचा प्रचार करत होती. त्याचबरोबर ती हरियाणा आणि दिल्लीतल्या फुटीरतावादी शेतकरी आंदोलनात देखील सामील झाली होती, असे कालच तपासात उघड झाले होते. तिच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट वर तिचे आंदोलनातले फोटो आणि व्हिडिओ आढळून आले.

 

मनोरंजनने मार्च महिन्यात केली रेकी

मार्च 2023 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान मनोरंजन बंगळूर येथून नवी दिल्लीत आला. व्हिजिटर पास घेऊन संसदेत गेला. त्यावेळी त्याने रेकी केली. त्यावेळी बुटांची तपासणी केली जात नसल्याचे त्याच्या लक्षात आले. 10 डिसेंबर रोजी सर्व आरोपी आपआपल्या राज्यातून दिल्लीत आले. मनोरंजन विमानाने दिल्लीत पोहचला. मनोरंजन हा रिक्षाचालक असल्याचे सांगितले जाते, पण त्याला बंगलोर ते दिल्ली हा विमान प्रवास आर्थिकदृष्ट्या परवडल्याचेही दिसते. मग हा विमान खर्च त्याने स्वतः केला की त्याला अन्य कोणी तिकिटांचा खर्च दिला??, याची देखील तपासणी सुरू आहे.

अमोल शिंदे रंगीत क्रॅकर घेऊन दाखल

अमोल शिंदे लातूरवरुन दिल्लीत आला. घरी सैन्य भरतीसाठी जात असल्याचे त्याने सांगितले. रंगीत स्मोक क्रॅकर घेऊन अमोल शिंदे आला होता. सागर शर्मा 13 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता महादेव रोड येथे गेला. त्याने खासदार प्रताप सिम्हा याच्या पीएकडून पास कलेक्ट केला. मग सर्व आरोपी इंडिया गेटवर भेटले. या सर्वांना अमोल शिंदे याने रंगीत क्रॅकर दिले. सागर शर्मा आणि मनोरंजन 13 डिसेंबर रोजी दुपारी 12.00 वाजता संसद भवनात दाखल झाले. त्यानंतर प्रत्यक्षात लोकसभेच्या गॅलरीतून उडी टाकण्याचा प्रकार घडला.

Parliament attackers misused name of Shaheed Bhagat Singh, and asim sarode will defend attacker Amol shinde

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात