पनामा पेपर्स प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सोमवारी ईडीसमोर हजर झाली. तपास यंत्रणेने दिल्लीत ऐश्वर्या रायचा जबाब नोंदवला. फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्टचे (फेमा) उल्लंघन करून परदेशात पैसे जमा केल्याचा तिच्यावर आरोप आहे. ईडीने ऐश्वर्या रायची सुमारे साडेपाच तास चौकशी केली, यादरम्यान तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले. Panama Papers Leak questioning of Aishwarya Rai lasted for 5 and a half hours
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पनामा पेपर्स प्रकरणात बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सोमवारी ईडीसमोर हजर झाली. तपास यंत्रणेने दिल्लीत ऐश्वर्या रायचा जबाब नोंदवला. फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्टचे (फेमा) उल्लंघन करून परदेशात पैसे जमा केल्याचा तिच्यावर आरोप आहे. ईडीने ऐश्वर्या रायची सुमारे साडेपाच तास चौकशी केली, यादरम्यान तिला अनेक प्रश्न विचारण्यात आले.
जर्मन वृत्तपत्र Süddeutsche Zeitung (SZ) ने 3 एप्रिल 2016 रोजी पनामा पेपर्स नावाचा डेटा प्रकाशित केला. त्यात भारतासह 200 देशांतील राजकारणी, उद्योगपती, सेलिब्रिटींची नावे होती, ज्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा आरोप होता. यामध्ये 1977 ते 2015 अखेरपर्यंतची माहिती देण्यात आली होती. या यादीत 300 भारतीयांची नावे समाविष्ट करण्यात आली होती. यामध्ये ऐश्वर्याशिवाय अमिताभ बच्चन, अजय देवगण यांच्या नावाचाही समावेश होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App