PADMA AWARDS 2021 : पद्मचाच बोलबाला ! केवाय वेंकटेशने जिंकले पद्म राष्ट्रपतींनी जिंकले मन – बदलला प्रोटोकॉल ; मंचावरून उतरत केला सन्मान…

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने यावेळी प्रदान केलेल्या पद्म पुरस्कारांना सगळ्यांनीच मानाचा मुजरा केला आहे.हा पुरस्कार प्रदान सोहळा सोशल मीडियावर जोरदार ट्रेंड करतो आहे. या सोहळ्यात 7 खेळाडूंना देखील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. या खेळाडूंमध्ये कर्नाटकच्या केवाय वेंकटेश (पॅरा स्पोर्ट्समन) यांचे ही नाव होते. केवाय व्यंकटेश म्हणजे ज्यांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रोटोकॉल मोडत मंचावरून खाली उतरून पद्मश्री पुरस्काराने त्यांचा गौरव केला. PADMA AWARDS 2021: Padmachach Bolbala! KY Venkatesh wins Padma President wins mind – changed protocol; Honor descended from the stage …

वेंकटेश यांनी 1994 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी जर्मनीमध्ये झालेल्या पहिल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. 2009 मध्ये पाचव्या पॅरालिम्पिक स्पर्धेत त्यांनी भारताचे नेतृत्व केले.

त्या वर्षी देशाने 17 पदके जिंकली.

  • खेळात आणि विकासातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • मंचावरून खाली उतरून राष्ट्रपतींनी केला सन्मान
  • यादरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या साधेपणानेही लोकांची मने जिंकली.
  • राष्ट्रपतींनी पॅरा-अॅथलीट केवाय व्यंकटेशचा मंचावरून खाली उतरून गौरव केला.
  • पॅरा-अॅथलीट आणि लिम्का रेकॉर्ड धारक केवाय वेंकटेश यांना पद्मश्री बहाल करण्यासाठी राष्ट्रपती पायऱ्या उतरून आले.
    केवाय व्यंकटेशने 2005 मध्ये चौथ्या वर्ल्ड ड्वार्फ गेम्समध्ये सहा पदके जिंकून ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदवलं.
  • पद्मश्री पॅरा अॅथलीट व्यंकटेश यांना अॅकॉन्ड्रोप्लासिया नावाचा शारीरिक विकासात अडथळा आणणारा आजार आहे, जो हाडांच्या विकासाचा विकार आहे.
  • या आजारामुळे त्यांच्या शरीराची वाढ 4 फूट 2 इंचांवर थांबली होती, मात्र या आजाराला बळी न पडता आयुष्याला नवे वळण देत त्यांनी
  • पॅरा अॅथलीट क्रीडा क्षेत्रात योगदान देण्याचा निर्धार केला.
  • 2005 च्या वर्ल्ड ड्वार्फ गेम्समध्ये सर्वाधिक पदके जिंकल्याबद्दल वेंकटेश यांनी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले .
  • खेळांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणारे आणि अॅथलेटिक्समध्ये पदके जिंकणारे ते पहिले भारतीय खेळाडू होते.
  • पॅरालिम्पिकप्रमाणेच वर्ल्ड ड्वार्फ गेम्स दर चार वर्षांनी एकदा आयोजित केले जातात.
  • आता निवृत्त झाले असून, ते कर्नाटक पॅरा-बॅडमिंटन संघटनेचे सचिव म्हणून काम करतात.

PADMA AWARDS 2021 : Padmachach Bolbala! KY Venkatesh wins Padma President wins mind – changed protocol; Honor descended from the stage

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub