विशेष प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत असुदद्दीन ओवेसी यांनी समाजवादी पक्षाविरुध्द रणशिंग फुंकले आहे. एमआयएमने सपातील बंडखोरांना आपल्या पक्षाकडून उमेदवारी देणे सुरू केले आहे.Owaisi blows trumpet by nominating Samajwadi Party rebel, MIM nominates Hindu candidate in Uttar Pradesh
दुसऱ्या यादीत तर चक्क सपातील एका हिंदू बंडखोराला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.साहिबाबाद मतदारसंघातून एमआयएमने हिंदू उमेदवाराला मैदानात उतरविले आहे. सपामधील बंडखोर पंडित मनमोहन झा उर्फ गामा यांना तिकीट दिलं आहे.
त्यामुळे येथील लढत रंगतदार झाली आहे. मुळचे बिहारमधील असलेले मनमोहन झा हे दहावी पास आहेत. गरीब कुटुंबातील असल्याने लहान वयातच काम शोधण्यासाठी ते दिल्लीमध्ये आले होते. तेव्हापासून त्यांचा राजकीय संघर्ष सुरू आहे.
आतापर्यंत त्यांनी समाजवादी पाटीर्चे जिल्हा उपाध्यक्ष आणि साहिबाबाद विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून काम पाहिले आहे. साहिबाबादमध्ये गामा नावाने प्रसिद्ध असलेल्या मनमोहन झा यांचे गाझियाबाद आणि साहिबाबाद परिसरात चांगली पकड आहे. त्यामुळेच साहिबाबादमध्ये त्यांचं वजन वाढलं होते. साहिबाबाद विधानसभा मतदारसंघ हा संपूर्ण राज्यात सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App