• Download App
    Positive news; भारतात लसींच्या २१६ कोटी डोसचे उत्पादन करणार; जागतिक कंपन्यांना भारतात खुले निमंत्रण; मोदी सरकारचा पुढाकार; नीती आयोगाची माहिती|Overall, 216 crore doses of vaccines will be manufactured in India between August-December - for India and for Indians., Dr VK Paul, Member (Health), NITI Aayog

    Positive news : भारतात लसींच्या २१६ कोटी डोसचे उत्पादन करणार; जागतिक कंपन्यांना भारतात खुले निमंत्रण; मोदी सरकारचा पुढाकार; नीती आयोगाची माहिती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोना फैलाव जितक्या वेगाने होतोय तेवढेच युध्दपातळीवर प्रयत्न करून त्याला रोखण्याचे उपाय केंद्र सरकार करताना दिसते आहे. केंद्राने यासाठी बरेच धोरणात्मक मूलभूत बदल केले असल्याचे स्पष्ट होत आहे.नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांच्या पत्रकार परिषदेत याचा प्रत्यय आला आहे. त्यांनी दिलेली माहिती अशी Overall, 216 crore doses of vaccines will be manufactured in India between August-December – for India and for Indians., Dr VK Paul, Member (Health), NITI Aayog

    केंद्र सरकार युध्दपातळीवर लसीकरणासाठी प्रयत्नात असताना येत्या ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ या कालावधीत कोरोना प्रतिबंधक लसींच्या २१६ कोटी डोसच्या उत्पादनाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. ही लस सर्व भारतीयांसाठी उपलब्ध असेल.



    भारत सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) आणि जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिलेल्या कोणत्याही लसीच्या आयातीस तसेच भारतात उत्पादनास परवानगी देण्यात आलेली आहे.

    संबंधित कंपन्यांना एक – दोन दिवसांमध्ये योग्य कागदपत्रांची पूर्तता करून लायसन्स देण्यात येईल. आयातीचे एकही लायसन्स सध्या पेंडिंग नाही.

    भारताचे परराष्ट्र मंत्रालय, बायोटेक डिपार्टमेंट, तसे अन्य संबंधित मंत्रालये जागतिक पातळीवरील औषध निर्मिती कंपन्या फायझर, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सन यांच्या नियमित संपर्कात आहे. त्यांना भारतात निर्यातीबरोबर उत्पादनाची सुविधा देऊन तसेच योग्य पार्टनरही शोधून देण्यात येईल.

    या सगळ्या कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत लस निर्मिती आणि निर्यातीबद्दल भारत सरकारला कळवतील, असे सांगण्यात येत आहे.

    रशियातून स्फुटनिक लस भारतात आली असून येत्या आठवडाभरात ती बाजारात उपलब्ध होईल. अर्थात ती मर्यादित स्वरूपात असेल. जुलै २०२१ मध्ये भारतात त्याचे उत्पादन सुरू होईल. १५ कोटी डोसची निर्मिती करण्यात येईल.

    Overall, 216 crore doses of vaccines will be manufactured in India between August-December – for India and for Indians., Dr VK Paul, Member (Health), NITI Aayog

     

    Related posts

    President Droupadi Murmu : राष्ट्रपती भवनात शौर्य पुरस्कार सोहळा; मुर्मू यांनी लेफ्टनंट जनरल रणजीत सिंग यांना अति विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित केले

    New Delhi EV Policy : दिल्लीत ईव्हीवर रोड टॅक्स-नोंदणी मोफत; ₹30 लाखांपर्यंतच्या गाड्यांवर सूट; 2028 पासून पेट्रोल-सीएनजी टू-व्हीलर्स बंद होतील

    Foreign Universities : 15 परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्याची मंजुरी; ऑगस्टपासून पहिली बॅच; परदेशी पदवी मिळेल, शिक्षणाचा खर्च होईल 30-40% कमी