मानसा येथील अर्श डल्लाच्या घरावर छापेमारी
विशेष प्रतिनिधी
चंदीगड : Punjab पंजाबमध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) छापे टाकत आहेत. एनआयएच्या पथकाने येथील रेगर बस्तीमध्ये एका व्यक्तीची चौकशी केली आहे. एनआयएची टीम ज्या व्यक्तीच्या घरी पोहोचली त्याच्या मुलीचं लग्न होतं आणि याच दरम्यान एनआयएची टीम त्यांच्या घरी पोहोचली.Punjab
त्यांच्या म्हणण्यानुसार, दहा ते पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या मुलीच्या फोनवर परदेशातून फोन आला होता, यासंदर्भात एनआयएचे अधिकारी चौकशीसाठी आले होते. टीमचे सदस्य पहाटे पाचच्या सुमारास रेगर बस्ती येथील रहिवासी बलजीत सिंग यांच्या घरी पोहोचले होते.
- Devendra Fadnavis : पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन
टीमने गेट ठोठावले तेव्हा कुटुंबातील सदस्य अजूनही झोपलेले होते. बलजीत सिंगची चौकशी करण्यासोबतच अधिकाऱ्यांनी त्याचा मोबाईलही तपासला. असे सांगितले जात आहे की, बलजीत कुमार हा स्वच्छता कर्मचारी असून एका कंत्राटदारासाठी काम करतो. बलजीत सिंग यांनी मीडियासमोर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
त्याचवेळी मनसा येथे एनआयएने शहरातील विशाल सिंग आणि मेहशी बॉक्सर यांच्या घरांवर छापे टाकले आहेत. विशाल सिंग हा पटियाला तुरुंगात बंद आहे, मात्र त्याचे अर्श डल्लासोबत संबंध असल्याचे बोलले जात आहे. तर महेशी बॉक्सर हा माजी खेळाडू असून सध्या तो अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे.
NIA raids in many districts of Punjab
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis : पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन
- Bangladesh : बांगलादेशातल्या हिंदूंवरच्या अत्याचाराबाबत मानवाधिकारवाले मूग गिळून गप्प का??
- vishwakarma scheme : केंद्राच्या विश्वकर्मा योजनेपासून लाखो तमिळ युवकांना वंचित ठेवण्याचे तामिळनाडूच्या द्रमुक सरकारचे कारस्थान!
- Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशातील कुल्ली येथे भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली