NIA Raids : महाराष्ट्रातील 3 ठिकाणांसह 9 राज्यांत 20 ठिकाणी एनआयएचे एकदाच छापे; ऑनलाइन कट्टरवाद व आरएसएस कार्यालय बॉम्बहल्ल्याच्या तपासाला वेग
देशात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणारे ऑनलाइन रॅडिकलायझेशन (कट्टरवादाचा प्रसार) आणि झारखंडमधील रांची येथील १६ जूनच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यालयावरील पेट्रोल बॉम्बहल्ला प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी मोठी कारवाई केली. एनआयएच्या पथकांनी महाराष्ट्रातील ३ ठिकाणांसह देशातील नऊ राज्यांमध्ये २० ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह कागदपत्रे व डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत.