चालकाचा जागीच मृत्यू ; सर्व प्रवासी गंभीर जखमी
विशेष प्रतिनिधी
Himachal Pradesh हिमाचल प्रदेशातील कुल्ली येथे प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर बसमधील सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात बस चक्काचूर झाली. अनीजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर बसमध्ये 25 ते 30 जण होते. Himachal Pradesh
कुलू डीसी तोरूल एस. रवीश यांनी सांगितले की, कुल्लू जिल्ह्यातील अनी उपविभागात 25-30 प्रवासी घेऊन जाणारी खासगी बस दरीत कोसळली. ते म्हणाले, “अपघातात बस चालकाचा मृत्यू झाला. तर सर्व प्रवाशांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आमची टीम घटनास्थळी उपस्थित आहे.”
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी एक खासगी बस कुल्लूमधील अनी येथून छतरीकडे जात होती, त्यावेळी शकेलहारजवळ बसला अपघात झाला. बसचे नियंत्रण सुटले आणि 200 फूट खोल दरीत कोसळली. त्यामुळे बसची दुरवस्था झाली. बस खड्ड्यात पडल्याची माहिती मिळताच अनेक स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. लोकांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत बस चालकाचा मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Horrific accident at Kulli in Himachal Pradesh bus carrying passengers falls into river
महत्वाच्या बातम्या
- Bharat Todo : भारत तोडो’च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीयत्व बळकट करण्याची गरज; अविनाश धर्माधिकारी यांचे प्रतिपादन
- मुंबईतील कुर्ला येथे भीषण अपघात, बेस्ट बसने 30 जणांना चिरडले, 4 जणांचा मृत्यू
- Eknath Shinde तुफान टोलेबाजी अन् एकनाथ शिंदे यांनी यासाठी मानले नाना पटोले यांचे आभार
- ED विकणार ६००० कोटींची जप्त मालमत्ता