नेपाळच्या हंगामी पंतप्रधान पहिल्याच दिवशी ठरल्या वेगळ्या; बांगलादेशाच्या हंगामी प्रमुखासारख्या सत्तेच्या खुर्चीला नाही चिकटून राहिल्या!!

नाशिक : नेपाळच्या हंगामी पंतप्रधान पहिल्याच दिवशी ठरल्या वेगळ्या; बांगलादेशाच्या हंगामी प्रमुखासारख्या सत्तेच्या खुर्चीला नाही चिकटून राहिल्या!!, नेपाळमध्ये शपथविधीच्याच दिवशी घडले.

नेपाळच्या सुप्रीम कोर्टाच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांनी नेपाळच्या हंगामी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्याच दिवशी म्हणजे काल त्यांनी नेपाळ मधल्या सार्वत्रिक निवडणुकांची तारीख जाहीर करून टाकली. 5 मार्च 2026 रोजी नेपाळच्या संसदेसाठी निवडणूक होईल, अशी अधिसूचना त्यांनी हंगामी पंतप्रधान पदाची सूत्रे हातात घेताच काढायला लावली.

जाळपोळ करणारी विद्यार्थीच साफसफाईच्या कामी

नेपाळमध्ये विद्यार्थी आंदोलनानंतर त्या विद्यार्थ्यांमधून कोणीही नेता देशाचे नेतृत्व करायला पुढे आला नाही दोन दिवसांच्या जाळपोळीनंतर ज्या विद्यार्थ्यांच्या हातांनी जाळपोळी केल्या तेच विद्यार्थ्यांचे हात नेपाळमध्ये साफसफाई करायला पुढे आले नेपाळ मधल्या आंदोलकांनी जाळपोळी विषयी माफी मागितली. आम्हाला भ्रष्टाचार नको होता. भ्रष्टाचार करणाऱ्यांचे सरकार नको होते‌. ते आम्ही घालविले, पण त्या काळात जाळपोळ झाल्या. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. ते व्हायला नको होते, असे पत्रक आंदोलक विद्यार्थ्यांनी काढले. हजारो विद्यार्थी नेपाळमध्ये साफसफाई मध्ये गुंतले. याच आंदोलकांनी मोठा दबाव निर्माण करून नेपाळच्या सहा माजी पंतप्रधानांना जाहीररित्या राजकारणातून निवृत्त होणे भाग पाडले. त्यांना तसे पत्र काढायला लावले.

– बांगलादेशात इस्लामी जिहास्टांचा हैदोस

बांगलादेशात वर्षभरापूर्वी असला कुठलाही प्रकार घडला नाही. तिथे विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली कट्टर जिहादी इस्लामिस्टांनी हिंसाचार घडवून आणला. हजारो हिंदूंची घरे लुटून जाळली. शिरकाण केले. नोबेल पुरस्कार विजेता अर्थशास्त्रज्ञ मोहम्मद युनूस यांना सत्तेच्या खुर्चीवर बसविले. त्यांनी अमेरिकेचे हस्तक असल्यासारखा कारभार सुरू केला ते सत्तेच्या खुर्चीला चिकटून राहिले बांगलादेशात कधी निवडणूक होणार याच्या तारखा बदलत राहिले. बांगलादेशातल्या इस्लामी जिहादिस्टांनी आणि मोहम्मद युनूस यांनी हिंदूंची माफी मागितली नाही .बांगलादेशातल्या हिंसाचाराविषयी खंत देखील व्यक्त केली नाही. उलट बांगलादेशातल्या हिंसाचाराला विद्यार्थी आंदोलनाची रंगरंगोटी केली. या दरम्यानच्या काळात मोहम्मद युनूस यांनी ढाकेश्वरी मंदिराला भेट देण्याचे राजकीय नाटक केले. पण बांगलादेशातले हिंदूंच्या विरोधातले अत्याचार थांबले नाहीत. मोहम्मद युनूस यांनी त्यावर परिणामकारक उपाययोजना केली नाही. बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका कधी होणार याची नेमकी तारीख त्यांनी अद्याप जाहीर देखील केलेली नाही. तारखांवर नुसती चर्चा सुरू ठेवली.

– सुशीला कार्कींचे वेगळेपण

या पार्श्वभूमीवर नेपाळच्या हंगामी पंतप्रधान सुशीला कार्की वेगळ्या ठरल्या. त्यांनी ज्या दिवशी सत्तेची सूत्रे हाती घेतली त्याच दिवशी नेपाळ मधल्या संस्थेच्या निवडणुकांची तारीख जाहीर केली. आपण हंगामी पंतप्रधान आहोत. त्यामुळे निवडणूक होईपर्यंत पदावर राहू. त्यापलीकडे पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसण्याची आपली इच्छा नाही, असे त्यांनी समोर येऊन जाहीर केले. सुशीला कार्की बनारस हिंदू विद्यापीठात शिकल्यात. त्या नेपाळच्या सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश होत्या‌. पण त्यांना कोणी नोबेल पुरस्कार देऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवले नाही. पण नोबेल पुरस्कार देऊन ज्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरविले, त्याच्यासारख्या त्या वागल्या देखील नाहीत. सत्तेच्या खुर्चीला चिकटून राहण्याची प्रवृत्ती त्यांनी दाखविली नाही.

Nepal’s interim Prime Minister Sushila Karki on first day

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात