• Download App
    कॉँग्रेसला फोडून राष्ट्रवादीचे मिशन केरळ, माजी महिला कॉँग्रेस अध्यक्षाही कॉँग्रेस सोडणार NCP's mission in Kerala will break up the Congress, the former women Congress president will also leave the Congress

    काँग्रेसला फोडून राष्ट्रवादीचे मिशन केरळ, माजी महिला काँग्रेस अध्यक्षाही काँग्रेस सोडणार

    राष्ट्रवादी कॉँग्रेसला महाराष्ट्राशिवाय कोठेही फारसे स्वीकारले गेलेले नाही. पण आता कॉँग्रेसलाच फोडून दुसऱ्या राज्यात किमान आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू झाला आहे. यामध्ये मिशन केरळ सुरू झाले असून कॉँग्रेसमधून फोडलेल्या आमदारामुळे मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यावर आता कॉँग्रेसच्या माजी महिला अध्यक्षांनाही पक्षात प्रवेश दिला आहे. NCP’s mission in Kerala will break up the Congress, the former women Congress president will also leave the Congress


    विशेष प्रतिनिधी

    तिरूवनंतपूरम : राष्ट्रवादी कॉँग्रेसला महाराष्ट्राशिवाय कोठेही फारसे स्वीकारले गेलेले नाही. पण आता कॉँग्रेसलाच फोडून दुसऱ्या राज्यात किमान आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून सुरू झाला आहे. यामध्ये मिशन केरळ सुरू झाले असून कॉँग्रेसमधून फोडलेल्या आमदारामुळे मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यावर आता कॉँग्रेसच्या माजी महिला अध्यक्षांनाही पक्षात प्रवेश दिला आहे.

    कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी केरळमधील निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पाच राज्यांतील निवडणुका असूनही ते बहुतांश वेळ केरळमध्येच प्रचार करत होते. तरीही महाराष्ट्रात आणि देशात कॉँग्रेससोबत असलेल्या राष्ट्रवादीने आपली वेगळी चूल मांडत डाव्या आघाडीशी घरोबा केला. त्याच वेळी कॉँग्रेस समितीचे सदस्य असलेले पी सी चाको चाकोदेखील ऐन निवडणुकीच्या काळात आले. त्यांनी मुंबईत शरद पवारांची भेट घेतली होती.



    विधानसभा निवडणुकीत उमेदवार निवडीवरून गटबाजी केल्याचा आरोप चाको यांनी केला होता. राष्ट्रवादीने त्यांना थेट प्रदेशाध्यक्ष बनविले. आता चाको यांच्या माध्यमातून कॉँग्रेसच्या अन्य नेत्यांवर गळ टाकण्यास सुरूवात झाली आहे. केरळमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकिट न मिळाल्याने मुंडन करणाऱ्या राज्य महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा लतिका सुभाष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

    राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे, जो काँग्रेसच्या परंपरेशी जोडलेला आहे. तसेच चाकोंसोबत चांगले संबंध आहेत. यामुळे मी चाकोंसोबत चर्चा केली. लवकरच माझ्या निर्णयाची घोषणा केली जाणार आहे, असे लतिका सुभाष यांनी सांगितले. लतिका सुभाष यांना पक्षात मोठी जबाबदारी मिळण्याची अपेक्षा आहे.

    NCP’s mission in Kerala will break up the Congress, the former women Congress president will also leave the Congress

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nepal : नेपाळमध्ये ओली-प्रचंड आणि देउबा यांच्या पक्षांमध्ये युती शक्य; जागावाटप आणि रणनीतीवर चर्चा सुरू

    Rahul Gandhi : अमित शहांवर आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल राहुल गांधींना समन्स; सुलतानपूर न्यायालयाने सांगितले- 19 जानेवारीला हजर व्हा

    RBI May : 2026 मध्ये व्याजदर 0.50% ने आणखी कमी होऊ शकतो; 2025 मध्ये 1.25% कपातीनंतरही आरबीआयकडे वाव