• Download App
    नवाज शरीफ जीव वाचविण्यासाठी लपून छपून नेपाळमध्ये भेटले, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा आरोप Nawaz Sharif secretly meetsNarendra Modi in Nepal to save lives, accuses Pakistan PM Imran Khan

    नवाज शरीफ जीव वाचविण्यासाठी लपून छपून नेपाळमध्ये भेटले, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा आरोप

    पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीव वाचवण्यासाठी लपून छपून नेपाळमध्ये भेटत होते. पाकिस्तानी सैन्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी नवाज शरीफ यांचा हा प्रयत्न सुरू होता, असा आरोप इम्रान खान यांनी केला आहे.Nawaz Sharif secretly meetsNarendra Modi in Nepal to save lives, accuses Pakistan PM Imran Khan


    विशेष प्रतिनिधी

    पाकिस्तान : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीव वाचवण्यासाठी लपून छपून नेपाळमध्ये भेटत होते. पाकिस्तानी सैन्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी नवाज शरीफ यांचा हा प्रयत्न सुरू होता, असा आरोप इम्रान खान यांनी केला आहे.

    जनरल शरीफला नरेंद्र मोदी दहशतवादी म्हणत होते. नवाज शरीफ मोदींचे कौतुक करत होते, अशा वेळी मी तर शांत बसलो नसतो. मात्र नवाज शरीफ दोस्ती करत होते. मोदीही शरीफ यांच्या घरच्या लग्नसोहळ्यात हजरे लावत होते. एकीकडे ड्रोन हल्ल्यात सर्वसामान्य लोक मारले जात होते आणि नवाज शरीफ म्हणत होते, मला नाही फरक पडत त्यांच्या मरण्याने, ही कोणती पद्धत आहे? असा सवालही इम्रान खान यांनी केला आहे.



    दरम्यान, सरकार पाडण्यामध्ये परदेशी शक्तींचा हात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. इमरान खान यांच्या पंतप्रधान पदाचा कार्यकाळ 3 वर्ष 10 महिने पूर्ण झाला आहे. अजून त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यासाठी कालावधी शिल्लक असतानाच त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला गेला आहे. मात्र, पाकिस्तानात आतापर्यंत एकही पंतप्रधान त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु शकलेला नाही.

    इम्रान खान यांच्या सरकारचा फैसला पुन्हा अविश्वास ठरावावर मतदान घेऊन केला जााणार आहे. पाकिस्तानी लष्करानं गेल्या काही दिवसांपासून सत्तासंघर्षात कोणतीही भूमिका घेतलेली नाही, असं शाहबाज शरिफ यांनी म्हटलं आहे. शाहबाज शरीफ हे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे भाऊ आहेत. त्यांना पीएम प्रोटोकॉल देण्याची प्रक्रिया सुरु झाल्याचं बोललं जातंय. त्यामुळे सध्या जगाचे लक्ष पाकिस्तानकडे लागले आहे.

    Nawaz Sharif secretly meetsNarendra Modi in Nepal to save lives, accuses Pakistan PM Imran Khan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया हँडलरच्या डोक्यातून आली कॉकरोच जनता पार्टी; पण भ्रम आणि वास्तव!!

    Cockroach Janata Party : कॉकरोच जनता पार्टीचे 5 दिवसांत 60 लाख फॉलोअर्स; जाहीरनामा प्रसिद्ध- महिलांना 50% आरक्षण, CJI ना राज्यसभेवर पाठवणार नाही

    NEET Re-Exam : नीट फेर-परीक्षेपूर्वी बनावट टेलिग्राम चॅनेलवर कारवाई; शिक्षणमंत्री म्हणाले- त्वरित ब्लॉक करा; पेपरफुटी प्रकरणात 5 आरोपींना तुरुंगात पाठवले