• Download App
    National Commission for Women नसरापूर अत्याचार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी कायदेशीर पावले उचलण्याच निर्देश

    नसरापूर अत्याचार प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; आरोपीला कठोर शिक्षा करण्यासाठी कायदेशीर पावले उचलण्याच निर्देश

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे ६५ वर्षांच्या नराधमाने चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार करत तिची हत्या केल्याची निर्घृण घटना घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप उसळला. आरोपीला फाशीची शिक्षा जाहीर करावी मागणी नातेवाईकांनी केली. या मागणीसाठी बंगळुरु – पुणे महामार्ग आंदोलकांनी रोखला.

    दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली. हे कृत्य केवळ घृणास्पद नाही, तर बालकांच्या मूलभूत अधिकारांचे गंभीर उल्लंघन असून समाजाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाने नमूद केले.

    – कठोर कायदेशीर कारवाईचे निर्देश

    फास्ट ट्रॅक न्यायालयात जलदगतीने सुनावणी व्हावी, असे निर्देश महिला आयोगाने दिले. राष्ट्रीय महिला आयोगाने पुण्यातील नसरापूरच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्यंत क्रूर अत्याचार आणि हत्येच्या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) आज स्वतःहून दखल घेतली. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवताना आयोगाने सांगितले की, हे कृत्य केवळ घृणास्पद नाही, तर बालकांच्या मूलभूत अधिकारांचे गंभीर उल्लंघन असून समाजाच्या सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. या अमानवीय गुन्ह्याने संपूर्ण देशात वेदना व संताप निर्माण झाला आहे. आयोगाच्या अध्यक्षांनी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाला (NCPCR) या प्रकरणात तातडीने संज्ञान घेण्याचे आणि तपासावर बारकाईने देखरेख ठेवण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी आवश्यक ती कायदेशीर पावले उचलण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

    पीडित कुटुंबाला त्वरित आर्थिक सहाय्य व नुकसानभरपाई मिळावी, POCSO कायद्यांतर्गत विहित मुदतीत दोषारोप पत्र (चार्जशीट) दाखल व्हावे आणि फास्ट ट्रॅक न्यायालयात जलदगतीने सुनावणी व्हावी, असा आग्रह आयोगाने धरला.

    4 वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाचे अत्याचार

    भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये शुक्रवारी, 1 मे रोजी एका 4 वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केली. नराधमाला पोलिसांनी अटक केली असली, तरी चिमुकलीचे नातेवाईक आणि ग्रामस्थ प्रचंड संतापले. त्यांनी पुण्यातील नवले पुलाजवळ शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून ठिय्या आंदोलन केले.

    पोलीस आयुक्तांशी चर्चा

    नसरापूर आंदोलकांनी ऐन गर्दीच्या वेळी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरल्यामुळे पुण्यात मोठी वाहतूक कोंडी झाली. आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी या आंदोलकांनी केली. या आंदोलकांची समजूत काढण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी माघार घेण्यास नकार दिला.

    National Commission for Women Takes Serious Cognizance of Nasrapur Atrocity Case

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात संघाची भूमिका कठोर; पण हिंदू विरोधी षडयंत्राकडेही बोट!!

    Hardeep Puri : पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर निर्णय 2-3 महिन्यांत; सरकारने म्हटले- इराण युद्धात खरेदी केलेले महागडे कच्चे तेल प्रक्रिया केले जात आहे, कंपन्यांना ₹74,781 कोटींचा तोटा

    दिल्लीत चार दहशतवाद्यांच्या अटकेपाठोपाठ गुजरात मध्ये आठ दहशतवाद्यांना अटक; जैश ए मोहम्मद संघटनेसाठी होते कार्यरत!!