• Download App
    four terrorists दिल्लीत चार दहशतवाद्यांच्या अटकेपाठोपाठ गुजरात मध्ये आठ दहशतवाद्यांना अटक; जैश ए मोहम्मद संघटनेसाठी होते कार्यरत!!

    दिल्लीत चार दहशतवाद्यांच्या अटकेपाठोपाठ गुजरात मध्ये आठ दहशतवाद्यांना अटक; जैश ए मोहम्मद संघटनेसाठी होते कार्यरत!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत घातपाती कारवाया घडवून आणायच्या बेतात असलेल्या चार दहशतवाद्यांना कालच दिल्ली पोलिसांच्या अँटी टेररिस्ट स्व्काडने (ATS) अटक केली त्या पाठोपाठ आज गुजरातमध्ये गुजरात पोलिसांच्या अँटी टेररिस्ट स्व्काडने (ATS) आठ दहशतवाद्यांना अटक केली. त्यामुळे संपूर्ण देशात घातपाती कारवाया घडवून आणायचा दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला गेला.

    एकीकडे पाकिस्तान भारताशी चर्चा करण्यासाठी उतावीळ झाला असताना दुसरीकडे भारतात दहशतवादी घातपाती कारवाया घडवून आणण्यासाठी पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयने आपली जुनीच मोडस ऑपरेंडी कायम ठेवल्याचे यातून दिसून आले. कारण दिल्ली आणि गुजरात या दोन्ही ठिकाणी पकडलेल्या दहशतवाद्यांच्या मोडस ऑपरेंडी मध्ये समानता दिसली. दोन्ही ठिकाणी मंदिर किंवा अन्य धार्मिक स्थळांवर हल्ले करायची तयारी हे दहशतवादी करत होते.

    – गुजरातेत आठ दहशतवाद्यांना अटक

    गुजरात आणि मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांतून ‘जैश-ए-मोहम्मद’ (JeM) या दहशतवादी संघटनेशी संबंधित आठ जणांना अटक करण्यात आली. गुजरातमध्ये दहशतवादी कारवायांना चालना देण्यासाठी एक सक्रिय जाळे उभारण्याच्या उद्देशाने हे आरोपी जैश-ए-मोहम्मद या संघटनेसाठी कार्यरत होते. या सर्व आठ आरोपींविरुद्ध UAPA (बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा) च्या कलम १३, १७, १८, ३८, ३९ आणि BNS (भारतीय न्याय संहिता) च्या कलम १४८ आणि ६१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती गुजरात एटीएसने (ATS) दिली.

    आरोपींची ओळख पुढील प्रमाणे : अहमद (वडील: अब्दुल्ला गाझीवाला) इब्राहिम (वडील: मोहम्मद हुसेन घाघा) मुदस्सिर (वडील: अब्दुल्ला गाझीवाला) झकारिया दुरानी (वडील: मोहम्मद अम्मार घाघा) मुफ्ती फौजान (वडील: इस्माईल दौवा) मोहम्मद अमीन शेरा मोहम्मद अब्दुल (वडील: रहमान सावडी) बिलाल मोहम्मद (वडील: अम्मार घाघा)

    Following the arrest of four terrorists in Delhi, eight terrorists have been arrested in Gujarat.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात संघाची भूमिका कठोर; पण हिंदू विरोधी षडयंत्राकडेही बोट!!

    Hardeep Puri : पेट्रोल-डिझेलच्या किमतींवर निर्णय 2-3 महिन्यांत; सरकारने म्हटले- इराण युद्धात खरेदी केलेले महागडे कच्चे तेल प्रक्रिया केले जात आहे, कंपन्यांना ₹74,781 कोटींचा तोटा

    Election Commission : ममतांपासून वेगळा झालेला बंडखोर गट म्हणाला- आम्हीच खरे TMC:निवडणूक आयोगाची भेट घेतली, लवकर निर्णय घ्या सांगितले