पतीचा पत्नीवर ॲसिड हल्ला; राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेत पोलिसांना दिले महत्वाचे आदेश!!
पुण्यात एका महिलेवर कथित ॲसिड हल्ला आणि तिच्यावर झालेला अत्यंत क्रूर घरगुती छळ यांबाबत माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली असून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून संबंधित गुन्हेगाराविरुद्ध कठोर कारवाईचे निर्देश दिले.