प्रतिनिधी
अयोध्या : श्रीरामललांची नगरी अयोध्येत मुख्य चौकाचे गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर असे नामकरण आज त्यांच्या जयंती दिनी झाले आहे. अयोध्येच्या मुख्य चौकात सरस्वती वीणेच्या रूपात लतादीदींचे स्मारक उभे केले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते आज त्या स्मारकाचे उद्घाटन झाले. Naming of Bharat Ratna Lata Mangeshkar of main square in AYODHYA
लतादीदींचे निधन झाले, त्याच वेळी योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील मुख्य चौकाला लता मंगेशकर यांचे नाव दिले जाईल, असा शब्द दिला होता. तो शब्द आज त्यांनी खरा करून दाखविला. इतकेच नाही, तर त्या चौकात भव्य दिव्य अशी सरस्वती वीणा उभी करून लतादीदींना प्रतीकात्मक श्रद्धांजली वाहिली आहे. या चौकाचे नामकरण गानसम्राज्ञी लता मंगेशकर असे केले आहे. त्याची ही छायाचित्र रुपी झलक :
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App