मुस्लिमांनी चार लग्ने करून 10 – 15 मुले पैदा करणे योग्य आहे काय??; आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मांचा तिखट सवाल

वृत्तसंस्था

बेंगलुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीतला प्रचार अखेरच्या टप्प्यात पोहोचला असताना भाजप आणि काँग्रेस या दोन्ही बाजूने एकमेकांवर तिखट हल्ले चढवले आहेत. राज्यात आधीच बजरंग दलावरच्या बंदीचा मुद्दा तापला असताना भाजपने तिथे प्रचारात जोर लावला आहे. Muslims to have 10 – 15 children after four marriages??; Assam Chief Minister Hemant Vishwasharma’s sharp question

पण आता त्या पलीकडे जाऊन आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी मुस्लिम जिहादी तत्वांवर तिखट हल्ला चढवला आहे. सगळे मुस्लिम करत नाहीत, पण आज देशाची प्रगती होत असताना मुस्लिमांनी चार – चार लग्ने करून दहा – दहा, पंधरा मुले पैदा करणे योग्य आहे काय??, असा तिखट सवाल हेमंत विश्वशर्मा यांनी कर्नाटक मधल्या प्रचार सभेत केला आहे.



संपूर्ण जग मंदीच्या सावटाखाली असताना देशाची प्रगती होते आहे. हिंदू समाजात दोन-तीन मुले जन्माला आली, तर सगळ्याच कुटुंबांना आनंद होतो. पण सगळे मुस्लिम परत नाहीत, पण काही मुस्लिम चार लग्न करतात आणि महिलांना दहा-पंधरा मुले जन्माला घालायला सांगतात. हे तर महिलांना मुले पैदा करण्याचे मशीन समजण्यासारखे आहे, अशी घणाघाती टीका हेमंत विश्वशर्मा यांनी केली.

हेमंत विश्वशर्मा गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक तळ ठोकून बसले असून राज्याच्या ग्रामीण भागात आणि शहरी भागांमध्ये त्यांच्या मोठमोठ्या सभा होत आहेत. त्यांच्याबरोबरच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील बाहेरच्या राज्यांमध्ये अत्यंत प्रभावी नेते संपूर्ण कर्नाटक पिंजून काढत आहेत. हेमंत विश्वशर्मा यांच्या भाषणांना कर्नाटकात जोरदार प्रतिसादही मिळतो आहे.

परवाच त्यांनी एका सभेत राहुल गांधी कर्नाटकच्या जनतेला वेगवेगळ्या गॅरेंटी देत आहेत, पण राहुल गांधींची गॅरंटी कोण घेणार??, हा खरा प्रश्न आहे. कारण सोनिया गांधी गेली वीस वर्षे त्यांना नेतृत्वपदी लादायचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांची कोणीच गॅरंटी घेऊ शकत नाही, अशा खोचक शब्दांमध्ये राहुल गांधींवर शरसंधान साधले होते. त्यानंतर काँग्रेसने देखील हेमंत विश्वशर्मांना तिखट शब्दात प्रत्युत्तर दिले होते.

Muslims to have 10 – 15 children after four marriages??; Assam Chief Minister Hemant Vishwasharma’s sharp question

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात