प्रतिनिधी
मुंबई : पहिल्या पावसात मुंबई भिजली आणि जलमय झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली आणि नागरिकांच्या सोयीसाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.Mumbai got soaked in the first rain, the Chief Minister came down to the waterlogged streets!!
आज सकाळी मुंबई उपनगरातील मिलन सब वे ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. सध्या या भागात पाणी साचलेले नाही, पावसाचे साठलेले पाणी टॅंकरमध्ये जमा करण्यासाठी स्टोरेज टॅंक ठेवलेल्या आहेत. या भागात पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.
त्याचवेळी मुख्यमंत्र्यांनी वरळी येथील कोस्टल रोड येथे हजर राहून पाणी साचण्याची कारणे जाणून घेतली. तसेच येथील परिस्थितीचा आढावा घेतला. या भागात पाणी साचू नये याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. आज जरी याठिकाणी पाणी नसले तरीही काल मुंबईत झालेल्या पहिल्याच पावसामुळे इथे पाणी साचून हा परिसर जलमय झाल्यामुळे येथे अनेक वाहने अडकून पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे याठिकाणी भेट देऊन येथील परिस्थिती जाणून घेतली.
Mumbai got soaked in the first rain, the Chief Minister came down to the waterlogged streets!!
महत्वाच्या बातम्या