अमेरिकन कोर्टात भारताचा मोठा विजय
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Tahawwur Rana पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा उद्योगपती तहव्वूर राणाला लवकरच भारतात आणण्याची शक्यता आहे. राजनैतिक प्रक्रियेद्वारे त्याला भारताच्या ताब्यात देण्याची तयारी सुरू आहे. 26/11 च्या मुंबई हल्ल्यात त्याचा हात होता. ऑगस्ट 2024 मध्ये अमेरिकन कोर्टाने या प्रकरणी निकाल दिला होता. भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारतात पाठवण्यास न्यायालयाने मान्यता दिली होती. आता राणाला लवकरच भारतात आणण्याची मोहीम तीव्र झाली आहे.Tahawwur Rana
मुंबई हल्ल्यात सहभागी तहव्वूर राणा याला भारताकडे सुपूर्द न करण्याची याचिका अमेरिकन न्यायालयाने फेटाळून लावली. राणाविरोधात भारताने पुरेसे पुरावे सादर केले आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे. 26/11च्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपपत्रात राणाच्या नावाचा समावेश केला होता. त्याच्यावर पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा सक्रिय सदस्य असल्याचा आरोप आहे.
तहव्वूर राणाने मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड डेव्हिड कोलमन हेडलीला मदत केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे, ज्याने या हल्ल्यासाठी मुंबईतील लक्ष्य शोधून काढले होते. 26/11च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्या जवळपास एक वर्षानंतर राणाला एफबीआयने शिकागोमध्ये अटक केली होती.
तहव्वूर राणा आणि त्याचा सहकारी डेव्हिड कोलमन हेडली यांनी मिळून पाकिस्तानी दहशतवाद्यांसाठी मुंबई हल्ला घडवून आणण्यासाठी ब्लू प्रिंट तयार केली होती. राणा सध्या लॉस एंजेलिस तुरुंगात आहे. अमेरिकेत राणाला त्याच्यावरील आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे, परंतु भारताच्या प्रत्यार्पणाच्या याचिकेमुळे त्याची तुरुंगातून सुटका झाली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App