वृत्तसंस्था
तिरुवनंतपुरम : केरळ मधली मुस्लिम संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया हिची मुजोरी प्रचंड वाढल्याचे दिसून येत आहे. आधी पीएफआयच्या मोर्चामध्ये हिंदू विरोधातल्या विषारी घोषणा आणि त्यानंतर त्याचे समर्थन करताना थेट केरळ हायकोर्टाच्या न्यायाधीशांवर अभद्र टिप्पणी इतपर्यंत पीएफआय संघटनेच्या म्होरक्यांची आणि सदस्यांची मजल गेली आहे. Mujori of Kerala Muslim Association PFI
केरळच्या अळापुळा पीएफआयने जो मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये एका मुलाने हिंदू आणि ख्रिश्चन समाजाच्या विरोधात विषारी घोषणा दिल्या. हिंदुनी अंत्यसंस्कारासाठी तांदूळ तयार ठेवावेत आणि ख्रिश्चनांनी धूप तयार ठेवावा. मुसलमानांची सभ्यतेत रहावे. अन्यथा आम्हाला स्वातंत्र्य कसे मिळवायचे ते माहिती आहे, अशा त्या घोषणा होत्या.
या घोषणांमुळे केरळ मधले वातावरण प्रचंड बिघडले. त्यानंतर केरळच्या कम्युनिस्ट सरकारने पीएफआय संघटनेचा म्होरक्या याह्या थंगल आणि त्या मुलाच्या वडिलांना याला अटक केली. त्याच्याबरोबर पीएफआय संघटनेचा दुसरा म्होरक्या मेहमूद बशीर यालाही अटक केली. या तिघांना पोलीसांनी केरळच्या हायकोर्ट समोर हजर केल्यानंतर याह्या थंगल याने न्यायाधीशांच्या विरोधातच अभद्र टिप्पणी केली. न्यायाधीशांना आमच्या घोषणांमुळे राग आला. ते भडकले कारण त्यांचे इनर वेअर देखील भगवे आहेत. ते भगवे असल्यामुळे तिथे लवकर जळजळ होते. ही टिप्पणी केल्यानंतर पोलिसांनी थंगल याला कोर्टाचा अवमान करण्याबद्दल नव्या आरोपाखाली अटक केली. हिंदू विरोधी विषारी घोषणापत्र आत्तापर्यंत 18 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
जमियतची विषारी भूमिका
एकीकडे केरळमधल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची मुजोरी आणि दुसरीकडे देवबंद मध्ये जमियात उलेमा ए हिंद संघटनेचे अधिवेशन यामधून केंद्र सरकार विरुद्ध जोरदार वातावरण निर्मिती करण्याचे काम सुरू आहे. काशीमधील ज्ञानवापी मशीद आणि मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमि – ईदगाह मशीद यांचे वाद कोर्टात असताना पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया आणि जमियात उलेमा ए हिंद या दोन संघटनांनी आक्रस्ताळी भूमिका घेऊन वातावरण आणखी दूषित करण्याचे प्रयत्न चालवल्याचे दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App