टेरर फंडिंग : PFI विरुद्ध केरळ, महाराष्ट्र, कर्नाटकात सर्वात धडक कारवाई; 62 म्होरक्यांसह 11 राज्यांतून 106 अटकेत


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात फैलावलेल्या टेरर फंडिंग विरोधात कट्टरतावादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI च्या मुसक्या आवळताना राष्ट्रीय तपास संस्था एनआयए आणि सक्तवसुली संचनारायण अर्थात ईडी यांनी सर्वाधिक धडक कारवाई केरळ, महाराष्ट्र आणि कर्नाटकात केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून PFI च्या प्रत्येकी 20 म्होरक्यांना या राष्ट्रीय तपास संस्थांनी अटक केली आहे, तर केरळ मधून 22 जणांना अटक केली आहे. Most striking action against PFI in Kerala, Maharashtra, Karnataka

सरकारी सूत्रांनी अधिकृतरित्या दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र, कर्नाटक, आसाम, राजस्थान, केरळ, दिल्ली, आंध्र प्रदेश, पुदुचेरी मध्य प्रदेश, बिहार राज्यांमधून PFI च्या 106 म्होरक्यांना अटक केली असून त्यामध्ये आंध्र प्रदेशातून 5, आसाम मधून 9, दिल्लीतून 3, कर्नाटकातून 20, महाराष्ट्रातून 20, केरळ 22, पुदुचेरीतून 3, राजस्थानातून 2, तामिळनाडूतून 10 आणि उत्तर प्रदेशातून 8, मध्य प्रदेशातून 8 म्होरक्यांना अटक केली आहे. 21 सप्टेंबर 2022 च्या पहाटेपासून देशभरातील 11 राज्यांमध्ये NIA आणि ED ची छापेमारीची धडक कारवाई सुरू आहे.

PFI अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया चे देशभर जाळे पसरले असून फॅमिली बँकिंग खात्यांमध्ये अरब देशांमधून सुमारे 5000 कोटी रुपये आल्याची गुप्तचर खात्याची माहिती आहे या माहितीच्या आधारावर राष्ट्रीय तपास संस्था अर्थात एनआयए आणि सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने छाप्यांची धडक कारवाई केल्याचे समजते आहे.

Most striking action against PFI in Kerala, Maharashtra, Karnataka

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात