• Download App
    More guns than population in America; Indians slam Donald Trump over free gun culture!! अमेरिकेत लोकसंख्येपेक्षा बंदुका जास्त; फ्री गन कल्चर वरून भारतीयांनी डोनाल्ड ट्रम्पना सुनावले!!

    अमेरिकेत लोकसंख्येपेक्षा बंदुका जास्त; फ्री गन कल्चर वरून भारतीयांनी डोनाल्ड ट्रम्पना सुनावले!!

    Donald Trump

     

    नाशिक : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयोजित केलेल्या डिनरच्या ठिकाणी गोळीबाराची घटना घडली. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षा व्यवस्थेवरचे प्रश्नचिन्ह गडद झाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन भरपूर खुलासा केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प गोळीबारातून वाचल्याबद्दल समाधान व्यक्त केले.More guns than population in America; Indians slam Donald Trump over free gun culture!!

    पण त्याचवेळी भारतीयांनी डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेतल्या फ्री गन कल्चर वरून परखड शब्दांमध्ये सुनावले.



    डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला नुकतेच hellhole म्हणजे नरक म्हणून हिणावले होते, त्याच डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकाच आता तुमच्यासाठी hellhole म्हणजे नरक बनल्याचे काही भारतीय अधिकाऱ्यांनी सुनावले.

    – भारतीय अधिकाऱ्यांनी सुनावले

    जम्मू काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एम. एस. वैद यांनी डोनाल्ड ट्रम्प गोळीबारातून वाचल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पण ट्रम्प यांनी भारताला नरक म्हटल्याबद्दल टीका केली. अमेरिकेमध्ये फ्री गन कल्चर असल्यामुळे तिथे असले गोळीबाराचे प्रकार नेहमीच घडतात. अमेरिकेने भारताकडून शस्त्र नियंत्रण शिकले पाहिजे. भारतामध्ये ज्या पद्धतीने 1956 पासून शस्त्र निर्बंध आहेत, त्यांची अंमलबजावणी होता आहे, त्यामुळे भारत अधिक सुरक्षित आहे, हे डोनाल्ड ट्रम्प यांनी लक्षात घेतले पाहिजे. उगाच भारताला hellhole म्हणण्यात मतलब नाही. अमेरिकेची काय स्थिती झाली बघा, असा टोमणा वैद यांनी हाणला.

    भारताचे अमेरिकेतले माजी राजदूत फेबियन अशाच प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांना परखड शब्दांमध्ये सुनावले. अमेरिकेतले अंतर्गत सुरक्षा व्यवस्था ढासळून गेली आहे. ट्रम्प यांच्या डिनर मधला गोळीबार हे त्याचेच निदर्शक आहे, अशा शब्दांमध्ये फेबियन यांनी अमेरिकन सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे काढले. अमेरिकेत लोकसंख्येपेक्षा बंदुका जास्त आहेत. त्याच्यावर कधीतरी नियंत्रण आणायचा विचार त्यांना करावाच लागेल. नाहीतर अशा गोळीबारांना कायमचे तोंड द्यावे लागेल, असा इशारा सुद्धा फेबियन यांनी दिला.

    – आर्म्स लॉबीच्या करामती

    अमेरिकेतल्या आर्म्स लॉबीला डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठिंबा दिला. त्या लॉबीने सुद्धा ट्रम्प यांना पाठिंबा दिला. त्यामुळे अमेरिकेतल्या गन कल्चर मध्ये वाढ झाली. अमेरिकेत प्रत्येकी 100 लोकांमागे 120 बंदुका आहेत. याविषयी चिंता केली पाहिजे तिथे शस्त्र निर्बंध लावले पाहिजेत पण डोनाल्ड ट्रम्प यांनी ते लावले नाहीत. बराक ओबामा यांनी शस्त्र निर्बंध लावायचे प्रयत्न केले पण त्यांना ते जमले नाही. आर्म्स लॉबीने त्यांना ते करू दिले नाही, याकडे फेबियन यांनी आवर्जून लक्ष वेधले.

    या सगळ्याचा अर्थ हाच की, डोनाल्ड ट्रम्प बाकीच्या जगाला सुरक्षा विषयी किंवा अन्य विषयांवर लेक्चरबाजी करतात पण त्यांना स्वतःच्या देशामध्ये सुरक्षित राहता येत नाही. इतर देशांना नावे ठेवण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या देशातील आणि स्वतःची सुरक्षा पाहावी, अशाच आशयाच्या टोमण्यांना त्यांना सामोरे जावे लागले.

    More guns than population in America; Indians slam Donald Trump over free gun culture!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    NCERT : NCERT ने अभ्यासक्रमात 1975-1977 आणीबाणी विभाग समाविष्ट केला; इयत्ता 9वीला शिकवले जाईल; NEP 2020 अंतर्गत अभ्यासक्रमात बदल

    Indian Passport : 1 जुलैपासून पासपोर्ट काढणे महाग होईल; सामान्य श्रेणीतील पासपोर्ट ₹2,500 आणि तत्काळ ₹5,000 मध्ये मिळेल, हरवल्यास किंवा खराब झाल्यास ₹8,500 पर्यंत शुल्क

    राम मंदिरात चोरी झाली, बरे झाले; विरोधकांचे सनातन धर्मावरचे प्रेम उफाळून वर आले!!