Donald Trump : ट्रम्प पुढच्या वर्षी भारतात येण्याची शक्यता; हैदराबादच्या रस्त्याला ट्रम्प यांचे नाव; अमेरिकन अध्यक्ष म्हणाले – धन्यवाद!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २०२७ च्या सुरुवातीला भारताचा दौरा करू शकतात. ‘आयएएनएस’ (IANS) या वृत्तसंस्थेनुसार, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी व्हाईट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना हे विधान केले. राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळातील ट्रम्प यांची ही भारताची दुसरी भेट असेल; यापूर्वी त्यांनी २०२० मध्ये भारताला भेट दिली होती, तेव्हा त्यांनी अहमदाबादमधील ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमात सहभाग घेतला होता.