• Download App
    Donald Trump अमेरिका - इराण युद्ध संपणार, 19 जून रोजी स्वाक्षरी; होर्मुझ पुन्हा उघडेल, ट्रम्प म्हणाले- जहाजांचे इंजिन चालू करा, तेलाला वाहू द्या

    Donald Trump : अमेरिका – इराण युद्ध संपणार, 19 जून रोजी स्वाक्षरी; होर्मुझ पुन्हा उघडेल, ट्रम्प म्हणाले- जहाजांचे इंजिन चालू करा, तेलाला वाहू द्या

    Donald Trump

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन डीसी : Donald Trump  अमेरिका आणि इराण रविवारी शस्त्रसंधी, म्हणजेच सीझफायर करारापर्यंत पोहोचले. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले की, इराणसोबतचा करार आता पूर्ण झाला आहे. तर इराणने निवेदन जारी करून सांगितले की, अमेरिकेसोबत अनेक महिने चाललेल्या प्रदिर्घ व कठीण वाटाघाटीनंतर दोन्ही देशांनी एका सामंजस्य कराराला, म्हणजेच एमओयूला अंतिम रूप दिले आहे.Donald Trump

    ट्रम्प म्हणाले की, या करारानुसार होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडली जाईल. त्यांनी असेही सांगितले की, त्यांनी इराणी बंदरांवर लावलेली अमेरिकेची नौदल नाकेबंदी तात्काळ हटवण्यास मंजुरी दिली आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “जगातील जहाजांनो, तुमची इंजिने चालू करा. तेल वाहू द्या.”Donald Trump



    पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सांगितले की, दोन्ही देश 19 जून रोजी स्वित्झर्लंडची राजधानी जिनिव्हा येथे शांतता करारावर स्वाक्षरी करतील. असे झाले, तर तेहरान आणि वॉशिंग्टन यांच्यातील 47 वर्षांतील ही सर्वात उच्चस्तरीय बैठक असेल. तथापि, दोन्ही देशांमधील कराराचा संपूर्ण दस्तऐवज अद्याप जारी करण्यात आलेला नाही.

    करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी इराणच्या तीन अटी

    इराण आणि अमेरिका यांच्यातील कराराचा संपूर्ण मजकूर अद्याप जाहीर करण्यात आला नाही. मात्र, इराणी प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, दोन्ही देशांमधील सामंजस्य करारात (MoU) अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश आहे.

    यामध्ये युद्ध आणि लष्करी कारवाया थांबवणे, होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) पुन्हा खुली करणे, अमेरिकेची नौदल नाकेबंदी उठवणे, इराणची गोठवलेली काही मालमत्ता (निधी) मुक्त करणे आणि अणुकार्यक्रम व निर्बंधांबाबत पुढील ६० दिवसांत वाटाघाटींसाठी एक आराखडा तयार करणे या गोष्टींचा समावेश आहे.

    इराणचे उप-परराष्ट्र मंत्री काझेम घरीबाबादी यांनी स्पष्ट केले आहे की, सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर सुरू होणाऱ्या अमेरिका-इराण यांच्यातील ६० दिवसांच्या वाटाघाटी या, अमेरिका आधी तीन विशिष्ट आश्वासने पूर्ण करते की नाही, यावर अवलंबून असतील.

    घरीबाबादी यांच्या मते, अमेरिकेने तीन पावले उचलणे आवश्यक आहे: १. नौदल नाकेबंदी संपवणे; २. युद्ध आणि सर्व लष्करी कारवाया थांबवणे; आणि ३. इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करणे.

    Historical US-Iran Ceasefire Reached; Donald Trump Signals Reopening of Strait of Hormuz

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Indian Navy : 2 हजार किमी प्रवास करत ‘जिवंत क्षेपणास्त्र’ घेऊन भारतात पोहोचले तेलवाहू जहाज!; कोचीत भारतीय नौदलाची थरारक कारवाई

    IAF AN-32 Cargo : हवाई दलाचे मालवाहू विमान क्रॅश, पायलटसह 5 ठार:लँडिंगवेळी लागली आग, 2 तुकडे झाले; आसामच्या जोरहाट एअरबेसवरील घटना

    Donald Trump : ’14 जूनला अमेरिका-इराण करार होणार’; ट्रम्प यांचा मोठा दावा, होर्मुझ सामुद्रधुनी तातडीने खुली करण्याचे संकेत