विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mohan Bhagwat हिंदू कुणालाही जिंकू इच्छित नाही, तो सर्वांना जोडू इच्छितो. हिंदुत्वामध्येच आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेची खात्री आहे, कारण तो विचारच मुळात तसा आहे, असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. भाजप ही संघाची पार्टी नाही. संघाने भाजपला जन्म दिलेला नाही. भाजप ही एक स्वतंत्र राजकीय संघटना आहे.Mohan Bhagwat
हे खरे आहे की, भाजपमध्ये अनेक स्वयंसेवक कार्यरत आहेत आणि ते तिथे प्रभावी भूमिकेत आहेत, मात्र संघ ही एक सामाजिक संघटना असून तिचे काम संपूर्ण समाजाला संघटित करणे हे आहे, सत्ता मिळवणे नाही, असेही त्यांनी शनिवारी सांगितले.Mohan Bhagwat
नेहरू सेंटरमध्ये आयोजित ‘संघ प्रवासाची १०० वर्षे
नवी क्षितिजे’ या व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी ते म्हणाले की, संघ राजकारणात हस्तक्षेप करतो किंवा भाजप ही संघाची शाखा नाही. स्वयंसेवक राष्ट्रहितासाठी ज्या क्षेत्रात जातील तिथे ते स्वतंत्रपणे काम करतात. त्यांना संघाचे मार्गदर्शन नसते, तर केवळ संस्कार असतात.
डॉ.भागवत यांनी मांडलेले मुद्दे
रामायण-महाभारतातही हिंदू शब्दाचा उल्लेख आढळत नाही.
समान पूर्वज: भारतात राहणाऱ्या सर्वांचे पूर्वज एकच आहेत. मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधव याच मातीचे असून त्यांना हा वारसा उपजत मिळाला आहे. पंथनिरपेक्षता: ‘सेक्युलरिझम’साठी ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द तांत्रिकदृष्ट्या चुकीचा आहे. त्याऐवजी ‘पंथनिरपेक्षता’ हा शब्द वापरणे अधिक सयुक्तिक ठरेल.
संघाचे ध्येय: संघाला सत्ता व लोकप्रियतेची ओढ नाही. केवळ समाज संघटन हेच डॉ. हेडगेवारांनी निश्चित केलेले उद्दिष्ट आहे.नेहरू सेंटरमधील व्याख्यानमालेत अभिनेता सलमान खानसह सुभाष घई, गीतकार प्रसून जोशी, हेमा मालिनी, गायिका अनुराधा पौडवाल उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App