नाशिक : बांगलादेशात नोबेल पुरस्कार विजेता हिंसक राज्यकर्ता मोहम्मद युनूस याने आपली सत्तेवरची पकड मजबूत करताना वेगवेगळे हातखंडे वापरले. त्यातलाच एक हातखंडा आता समोर आला असून मोहम्मद युनूसच्या सरकारने बांगलादेशातल्या चलनी नोटांवर हिंदू मंदिर आणि बौद्ध विहाराचा फोटो छापला आहे. त्याचबरोबर बांगलादेशातल्या इतर राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांचे फोटो नोटांवर आणले आहेत. ईद उल अझा सणाच्या आधी बांगलादेशी रिझर्व बँकेने या नोटा जारी केल्या आहेत.
पण हे सगळे करण्यामागचा मोहम्मद युनूस याचा इरादा मात्र अजिबात शुद्ध नाही. उलट जास्त घातक आहे. शेख हसीना यांच्या राजवटीच्या काळात बांगलादेशातल्या नोटांवर शेख मजिबूर रहमान यांचा फोटो होता. तो नोटांवरून हटविण्यासाठीच मोहम्मद युनूस सरकारने हा “नवा उद्योग” केला आहे. तो करताना त्याने “आयडियेची कल्पना” लढवून 20 टक्यांच्या नोटेवर हिंदू मंदिर आणि बौद्ध विहाराचा फोटो छापला आहे. बांगलादेशातल्या दिनाजपूर जिल्ह्यातल्या कांताजी मंदिराचा फोटो आणि त्याच बरोबर पहाडपूरच्या बुद्ध विहाराचा फोटो या नोटेवर दिसत आहे. कांताजी मंदिर हे कृष्ण रुक्मिणीचे मंदिर असून ते बंगाली हिंदूंचे मोठे श्रद्धास्थान आहे. त्याचबरोबर पहाडपूरचा बुद्ध विहार देखील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मोहम्मद युनूस याच्या सरकारने या दोन्ही धार्मिक स्थळांचा 20 टक्यांच्या नोटेवर छापला आहे.
मोहम्मद युनूसची चालूगिरी
पण यातला मोहम्मद युनूस सरकारचा चालूपणा असा की, हिंदू मंदिर आणि बुद्ध विहार यांना सगळ्यांत कमी किमतीच्या म्हणजे 20 टक्यांच्या नोटेवर छापण्यात आले असून 50 टक्यांच्या नोटेवर ढाक्याच्या नवाबाचा पॅलेस एहसान मंजिल आणि बांगलादेशी पेंटर झैनूल अबेदिन याचे संग्राम पेंटिंग यांचे फोटो छापले आहेत. 1000 टक्यांच्या नोटेवर बांगलादेशी जातीय संसदेचा फोटो छापला आहे.
पण बांगलादेशातल्या चलनी नोटांवर हिंदू आणि बौद्ध धर्मीयांच्या धार्मिक स्थळांना स्थान देऊन मोहम्मद युनूसने स्वतःची राजवट धर्मनिरपेक्ष असल्याची डिंग मारली आहे. वास्तविक विद्यार्थी आंदोलनाच्या नावाखाली जिहादी इस्लामिस्टांनी माजवलेल्या हिंसाचारातून मोहम्मद युनूसने बांगलादेशाची सत्ता बळकावली. त्यावेळी जिहादी इस्लामिस्टांनी नंगानाच करून शेकडो हिंदू आणि बौद्धांचे शिरकाण केले. हजारो हिंदू आणि बौद्धांना बेघर केले. पण मोहम्मद युनुस याच्या सरकारने हिंदू आणि बौद्ध समाजांना संरक्षण दिले नाही. हत्याकांड करणाऱ्या जिहादी इस्लामिस्टांना फासावर चढवले नाही. त्याऐवजी 20 टक्क्यांच्या नोटेवर हिंदू मंदिर आणि बौद्ध विहाराचा फोटो छापून हिंदू हत्याकांडाचे पाप धुवायचा प्रयत्न केला आहे. पण हे पाप असे सहज धुवून निघणारे नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App