जवानांसोबत मोदींची दिवाळी; दिल्ली दारू घोटाळ्यात तुरुंगाची हवा खात असलेल्या नेत्यांच्या घरी केजरीवालांची दिवाळी!!

Modi's Diwali with indian army soldier

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलातील जवानांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिवाळी तर दिल्ली दारू घोटाळ्यात तुरुंगाची हवा खात असलेल्या नेत्यांच्या घरी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवारांची दिवाळी, असे चित्र आज दिसले!! Modi’s Diwali with indian army soldier

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले दिवाळी सीमावरती भागात जाऊन भारतीय सैन्य दलासमवेतच साजरी करतात. तेथे जवानांची ते संवाद साधतात संपूर्ण देश जवानांच्या पाठीशी उभा असल्याचा त्यांना विश्वास देतात. त्याच प्रथा परंपरेचे पालन करत पंतप्रधान मोदी आज हिमाचल प्रदेशातील लेपचा इथे पोहोचले आणि त्यांनी जवानांबरोबर दिवाळी साजरी केली. जिथे राम, तिथे अयोध्या; तसेच जिथे भारतीय सैन्यातले जवान, तिथे माझा दिवाळीचा सण,अशी घोषणा मोदींनी केली.

पण त्याच वेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मात्र आपल्या “तुरुंगवासी” सहकाऱ्यांना “विसरले नाहीत”. दिल्लीच्या दारू घोटाळ्यात तुरुंगाची हवा खात असलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह यांच्या घरी जाऊन अरविंद केजरीवाल यांनी दिवाळी साजरी केली. दारू घोटाळ्यात अडकलेल्या आणि कायदेशीर दृष्ट्या आरोपी असलेल्या नेत्यांच्या पाठीशी आम आदमी पार्टी ठाम उभी राहिली असल्याचा निर्मळा अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह यांच्या कुटुंबीयांना दिलाच, त्याचबरोबर समस्त भारतीय जनतेला देखील “विशेष संदेश” दिला.

त्यामुळे एक विद्यमान पंतप्रधान आपली दिवाळी कशी साजरी करतात आणि पंतप्रधान पदाची महत्त्वाकांक्षा बाळगणारे एक मुख्यमंत्री आपली दिवाळी कशी “साजरी” करतात, हे समस्त भारतीयांना दिसले.

Modi’s Diwali with indian army soldier

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात