मोदी एक दिवस लक्षद्वीपला गेले, तर मालदीवमध्ये भूकंप; मुख्यमंत्र्यांची स्तुतीसुमने

विशेष प्रतिनिधी

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक पातळीवरचे सर्वांत मोठे नेते आहेत. ते एक दिवस लक्षद्वीपला गेले, तर मालदीवमध्ये भूकंप झाला, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींच्या नेतृत्वावर स्तुतीसुमने उधळली. नाशिक मध्ये सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेक अनोखे पैलू युवकांना सांगितले. Modi went to Lakshadweep for a day, earthquake in Maldives

एकनाथ शिंदे म्हणाले :

अयोध्येत राम मंदिर बनवून मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण केले आहे. राम मंदिराअगोदर पंतप्रधान मोदींचा दौरा शुभ संकेत आहे. जगात सर्वांत लोकप्रिय पंतप्रधान म्हणून  मोदी यांचा उल्लेख करण्यात येतो.

मोदी आहे तर मुमकीन आहे. मोदी एक दिवस लक्षद्वीपला गेले, तर मालदीवला भूकंप आला. जगात मोदींचे नाव आदराने घेतले जाते. मोदींना कोणी कोणी बॉस म्हणतात, तर मोदींसोबत कोणी सेल्फी काढतात. मोदींमुळे देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आपली अर्थ व्यवस्था पोहचली आहे.  मोदी देशभक्त राष्ट्रभत नेता आहेत. प्रधानमंत्री झाले हे भाग्यच आहे.

Modi went to Lakshadweep for a day, earthquake in Maldives

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात