विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठी माध्यमांनी नेहमीप्रमाणे शरद पवारांची “पॉवरफुल” खेळी असे वर्णन करून नागालँडची बातमी दिली आहे. नागालँड मध्ये भाजप आणि एनडीपीपी ही स्थानिक आघाडी पूर्ण बहुमताने सत्तेवर आली आहे. 60 पैकी 37 जागा या आघाडीने जिंकल्या आहेत. तरीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी त्या सरकारला पाठिंबा दिला आहे. मराठी माध्यमांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या याच पाठिंब्याचे वर्णन शरद पवारांची “पॉवरफुल” खेळी असे केले आहे. वास्तविक ही पवारांची “पॉवरफुल” खेळी वगैरे काही नसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीच्या भीतीने ही खेळी झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. Marathi media praised powerfull Pawar game, but NCP supports naga land BJP ndpp government due to fear of NCP split
मूळात नागालँड मधील 60 जागांपैकी 37 जागा जिंकून एनडीपीपी आणि भाजप यांची आघाडी सत्तेवर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तिथे 7 जागांवर विजय मिळवला आहे. नागालँड मधल्या नव्या सरकारला राष्ट्रवादीसह कोणाच्याच पाठिंबाची गरज नाही. पण नागालँड मधल्या स्थानिक नेत्यांनी आपापल्या राजकीय सोयीनुसार राष्ट्रवादीचे तिकीट घेऊन निवडणूक लढवली होती. शरद पवार किंवा राष्ट्रवादीचे बाकीचे कोणते स्टार प्रचारक तिथे प्रचार देखील गेले नव्हते.
Shivsena – NCP : स्थानिक निवडणुकाच अजून डळमळीत, पण चर्चा आढळराव पाटील आणि डॉ. अमोल कोल्हेंच्या राजकीय भवितव्याची!!
पण तरीही राष्ट्रवादीचे 7 आमदार त्यांच्या स्थानिक बळावर निवडून आले. या आमदारांनी स्थानिक पातळीवर एनडीपीपी – भाजप आघाडीच्या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाला राष्ट्रवादीच्या केंद्रीय नेतृत्वाचा अर्थात शरद पवारांचा पाठिंबा नसल्याचा खुलासा नागालँडचे राष्ट्रवादीचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी केला होता. पण अखेरीस राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा दिल्याचे पत्र दिले. याच बातमीचे वर्णन मराठी माध्यमांनी पवारांची “पॉवरफुल” खेळी असे केले.
वास्तविक राष्ट्रवादीच्या केंद्रीय नेतृत्वाने एनडीपीपी – भाजप या आघाडी सरकारला पाठिंबा दिला नसता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तिथे फुटले असते. कदाचित सर्व सातही आमदारांनी परस्पर सरकारला पाठिंबा देऊन मोकळे झाले असते आणि राष्ट्रवादीचे देशपातळीवर नाचक्की झाली असती. त्यामुळेच अखेरीस राष्ट्रवादीच्या केंद्रीय नेतृत्वाने ही राजकीय नाचक्की टाळण्यासाठी भाजप बरोबर सत्तेत मांडीला मांडी लावून बसण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट दिसते.
पण हे करताना यात देखील राष्ट्रवादीने मेख मारून ठेवली आहे. आमचा एनडीपीपी पक्षाला पाठिंबा आहे. कारण त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे भाजपशी त्याचा संबंध नाही, असा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. पण मराठी माध्यमांनी मात्र नेहमीप्रमाणे पवारांची “पॉवरफुल” खेळी असे वर्णन करून नागालँडची बातमी रंगवली आहे
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App