मोठी मंदिरे बांधताना ममता बॅनर्जी आणि जितेंद्र आव्हाड यांनी KCR यांचा सल्ला घेतला नाही का??

पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात मोठी मंदिरे बांधताना ममता बॅनर्जी आणि जितेंद्र आव्हाड या दोन्ही एकमेकांशी तुलना न होऊ शकणाऱ्या नेत्यांनी KCR यांचा सल्ला घेतला नाही का??, असा शीर्षकामध्ये विचारलेला सवाल अनेकांना अजब वाटेल. पण तो तेवढा अजब निश्चित नाही. कारण KCR यांचा सल्ला न विचारताच ममता बॅनर्जी आणि जितेंद्र पवार यांनी आपापल्या राज्यांमध्ये मोठी मंदिरे बांधून घेतलीत. त्यांनी मंदिरे बांधण्यापूर्वी KCR यांचा सल्ला घेतला असता, तर कदाचित हे दोन्ही नेते ही मंदिरे बांधायच्या फंदात पडले नसते. कितीही मोठी मंदिरे बांधली तरी लोक आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत. आपला इतिहास आपणास पिच्छा सोडत नाही, हे KCR यांनी कदाचित ममता बॅनर्जी आणि जितेंद्र आव्हाड या दोन्ही नेत्यांना समजावून सांगितले असते. मंदिरे बांधकामाचा विचार त्यांच्या डोक्यातून काढून टाकला असता, पण दोन्ही नेत्यांनी KCR त्यांचा सल्ला न घेतल्यानेच दोन राज्यांमध्ये मोठी मंदिरे उभी राहिलीत.

ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल मधल्या दिघा मध्ये उभारलेल्या जगन्नाथ मंदिराचे राजकीय वर्तमान आणि जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यामध्ये उभारलेल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे राजकीय वर्तमान समान आहे. दोघांनाही आपापल्या राज्यांमधल्या “हिंदू मतांची चिंता” लागून राहिलीय म्हणूनच त्यांनी राहुल गांधींसारखा नुसताच temple run करण्याऐवजी थेट मंदिरे उभारण्याचा मार्ग पत्करला आहे. पण हा मार्ग त्यांना निवडणुकीच्या यशापर्यंत घेऊन जाईलच याची कुठलीही गॅरंटी कुणीही देऊ शकत नाही. त्याचा अनुभव 2022 – 2023 मध्ये के चंद्रशेखर राव अर्थात KCR यांनी तेलंगणा राज्यात घेऊन झाला आहे.



– KCR यांची मंदिर बांधणी

के. चंद्रशेखर राव यांनी 2023 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंदू मतांची राजकीय बेगमी करण्यासाठी यदाद्री भुवनगिरी जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठे लक्ष्मी नरसिंह मंदिर उभारले. त्यासाठी त्यांनी सरकारी तिजोरीतून तब्बल 1800 कोटी रुपयांचा खर्च केला. त्याचा उद्घाटन समारंभ देखील भव्य धार्मिक समारंभात केला त्यावेळी कुठल्याही इतर राजकीय पक्षाच्या मोठ्या किंवा छोट्या नेत्यांना चंद्रशेखरराव यांनी त्या मंदिराकडे अथवा उद्घाटन समारंभाकडे फिरकू देखील दिले नव्हते. आपण एवढा प्रचंड खर्च करून एवढे भव्य मंदिर उभारतो आहोत तर त्याचा राजकीय लाभ आपल्यालाच मिळाला पाहिजे, असा त्यांचा त्यावेळी होरा होता. मार्च 2022 मध्ये चंद्रशेखरराव यांनी लक्ष्मी नरसिंह मंदिराचे उद्घाटन केले. त्यानंतर दीडच वर्षांच्या आत विधानसभेच्या निवडणुकांमध्ये नोव्हेंबर – डिसेंबर 2023 मध्ये विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राब यांच्या पक्षाने हापटी खाल्ली. काँग्रेस पक्षाने त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव केला. 1800 कोटी कोटी रुपये बांधून उभारलेल्या लक्ष्मी नरसिंह मंदिराचा कुठलाही राजकीय लाभ चंद्रशेखर राव यांना झाला नाही. कारण त्यांनी हिंदू मतांच्या लाभासाठी जरी ते मंदिर बांधले होते तरी त्याआधी त्यांनी केलेले मुस्लिम तुष्टीकरण तेलंगणा मधली जनता विसरली नव्हती. त्यांनी आपल्याबरोबर चार-पाच मुस्लिम नेत्यांना उपमुख्यमंत्री केले होते. मुस्लिमांना वेगवेगळ्या भरमसाठ सवलती दिल्या होत्या. या त्यांच्या राजकीय इतिहासाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. भव्य मंदिर उभारूनही ते स्वतःची प्रतिमा हिंदू म्हणून प्रस्थापित करू शकले नाहीत.

तेलंगणाचे मुख्यमंत्र्यांना जे जमले नाही, ते ममता बॅनर्जी यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला किंवा जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या तुलनेने फारच छोट्या नेत्याला जमेल, असे घडण्याची सुतराम शक्यता नाही.

ममतांनी दिघामध्ये जगन्नाथ मंदिर उभारताना म्हणे बंगाल मधल्या चैतन्य प्रभू भक्ती संप्रदायाचा आधार घेतला. ओडिषा आणि बंगाल मधला संस्कृतिक पूल मजबूत केला. पश्चिम बंगालमधील जनता मुर्शिदाबाद मधला हिंसाचार विसरेल आपल्या सरकारचे आधीचे मुस्लिम लांगुलचलन दुर्लक्षित करेल, अशी राजकीय व्यवस्था ममतांनी केल्याचे मानले जात आहे. पण म्हणून ममतांच्या व्यवस्थेनुसार सगळे घडेलच याची कुठलीही गॅरंटी नाही. कारण तेलंगण मधला अनुभव त्यापेक्षा विपरीत आहे. तेलंगणात तर चंद्रशेखर राव यांनी 1800 कोटी रुपये खर्च करून मंदिर बांधले त्या तुलनेमध्ये ममता बॅनर्जी यांनी साधारण 250 कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते. जर तेलंगणातले हिंदू चंद्रशेखर राव यांच्या 1800 कोटी रुपयांनी गंडले नसतील, तर बंगाल मधले हिंदू ममतांच्या अडीचशे कोटी रुपयांना गंडतील का??, हा खरा सवाल आहे.

मंदिर बांधले, पण हिंदुत्वाला विरोध कायम

जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानी मातेचे मंदिर बांधताना किती खर्च केला त्याचा तपशील त्यांनी सांगितलेला नाही, पण त्यांनी शरद पवारांना उद्घाटनाच्या पूजेला बोलावले होते आणि पवारांनी तिथे प्रतिभाताई यांच्यासह जाऊन पूजा आणि आरती केली. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाले. त्यामुळे पवार आता आपली मुंज केलेली पण दाखवतील, असा टोमणा प्रकाश महाजन यांनी मारला. तो जितेंद्र आव्हाड यांना झोंबला. तुमची मुंज तुमच्यापाशीच राहू द्या, आम्हाला बहुजनांना तिची गरज नाही. आम्ही बहुजनांचे दैवत तुळजाभवानी मातेचे मंदिर उभारले आहे. ते सगळ्यांसाठी खुले आहे, अशी भाषा जितेंद्र आव्हाड यांनी वापरली. या भाषेतून त्यांनी आपला हिंदुत्वाचा विरोध कायम ठेवला.

म्हणूनच एवढे सगळे करून ममता बॅनर्जी काय किंवा जितेंद्र आव्हाड काय, यांनी KCR यांचा सल्ला न घेता मंदिरे बांधल्याने त्यांना संबंधित मंदिरांचे राजकीय लाभ होतीलच याची गॅरंटी कोण देणार??, हा सवाल कायम आहे!!

Mandir politics of Mamata Banerjee and Jitendra awhad

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात