विशेष प्रतिनिधी
बेंगलोर : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी दस्तूर खुद्द सोनिया गांधींनी प्रयत्नपूर्वक जमावलेल्या विरोधकांच्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसचे पंतप्रधान पदावरचा दावा सोडला. पण त्यामुळेच हा दावा खर्गे यांनी सोडला असला तरी गांधी परिवाराने तो सोडला आहे का??, असा सवाल तयार झाला आहे.Mallikarjun Kharge abandons Congress’ claim to prime minister post to hear opposition; But what about the Gandhi family?
विरोधकांच्या बैठकीत 26 पक्षांचे नेते उपस्थित आहेत. खुद्द सोनिया गांधींनी त्यासाठी प्रयत्न केल्याने त्याला वेगळे राजकीय गांभीर्य प्राप्त झाले आहे. पण त्याच वेळी काँग्रेसचा “राहुल प्रयोग” फसल्याची कबुलीच एक प्रकारे काँग्रेस नेत्यांनी देऊन टाकली आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी ऐक्याचा सगळ्यात मोठा रोडा म्हणजे पंतप्रधानपद या विषयावर भाष्य करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट भूमिका घेत काँग्रेसला पंतप्रधान पदात रस नसल्याचा दावा केला. देशात लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता वाचली पाहिजे या भूमिकेतून काँग्रेसने विरोधकांचे ऐक्य घडवायला सुरुवात केल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
मात्र मल्लिकार्जुन खर्गे यांचे वक्तव्य ही काँग्रेसची अधिकृत भूमिका आहे का?? कारण खुद्द सोनिया गांधी अथवा राहुल गांधी यांनी अजून पर्यंत तरी त्याला दुजोरा दिलेला नाही. त्याचवेळी सोनिया गांधींनी प्रयत्न केल्यामुळे विरोधी ऐक्यात सुरुवातीलाच मिठाचा खडा पडू नये यासाठी गांधी परिवाराने मल्लिकार्जुन खर्गे यांना पुढे करून पंतप्रधान पदाची चाचपणी केली आहे का??, अशीही चर्चा बाकीच्या विरोधकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.
त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आज विरोधी ऐक्याच्या बैठकीत सामील झाले आहेत. पण त्यांच्या भूमिकेवर काँग्रेसला संशय आहे. एकीकडे पुतण्याला भाजपबरोबर सत्तेची फळे चाखायला पाठवून दुसरीकडे आपण विरोधकांबरोबरच आहोत असे शरद पवार दाखवत असल्याचा काँग्रेस नेत्यांना संशय आहे. त्यामुळे विरोधकांची बैठकच मुळात पंतप्रधान पदाचा मुद्दा आणि शरद पवार यांच्यासारख्या विश्वासार्हतेवर ठळक प्रश्नचिन्ह असलेले नेते त्यात सहभागी झाल्यामुळे वादग्रस्त आणि संशयास्पद ठरत आहे.
शिवाय काँग्रेसने जर खरच पंतप्रधानपदावरचा दावा सोडला असेल तर मग बाकीच्या प्रादेशिक पक्षांमधल्या कोणत्या नेत्याला काँग्रेस मोदींसमोर चेहरा म्हणून पुढे आणणार आणि त्यांना पंतप्रधान करणार??, असा सवाल तयार होऊन पंतप्रधानपदासाठी विरोधी ऐक्यात सामील झालेल्या प्रादेशिक नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. यामध्ये अर्थातच ममता बॅनर्जी अरविंद केजरीवाल एम के स्टॅलिन हे नेते त्यांच्या सध्याच्या संख्याबळाच्या आधारे आघाडीवर आहेत.
Mallikarjun Kharge abandons Congress’ claim to prime minister post to hear opposition; But what about the Gandhi family?
महत्वाच्या बातम्या
- विरोधी ऐक्यासाठी जमले होते 26 पक्ष, आज NDAच्या बैठकीला 38 पक्षांचा सहभाग
- संशयाचे पडळ घेऊन शरद पवार आज बंगलोरच्या विरोधी ऐक्याच्या बैठकीत!!
- एसबीआयचा अहवाल- महापुरामुळे देशात तब्बल 15 हजार कोटींचे नुकसान, 92 टक्के जनता विमाच काढत नाही
- दिल्लीतील अधिकारांच्या लढाईवर घटनापीठ करणार सुनावणी, सुप्रीम कोर्टाचा नायब राज्यपाल- मुख्यमंत्र्यांना मिळून काम करण्याचा सल्ला