पुरी डीएम-एसपीची बदली; डीसीपी-कमांडंट निलंबित; भरपाई जाहीर
विशेष प्रतिनिधी
पुरी – Jagannath Rath Yatra रथयात्रेतील चेंगराचेंगरीनंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेत पुरीचे जिल्हाधिकारी आणि एसपी यांची बदली केली आहे. याशिवाय, कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल डीसीपी विष्णूपती आणि कमांडंट अजय पाधी यांना निलंबित करण्यात आले आहे.Jagannath Rath Yatra
दरम्यान, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी प्रत्येक मृत भाविकाच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी विकास आयुक्तांच्या देखरेखीखाली सविस्तर प्रशासकीय चौकशीचे आदेश दिले आहेत आणि जिल्हाधिकारी आणि एसपी यांची बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. चंचल राणा यांची नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर पिनाक मिश्रा यांनी नवीन एसपी म्हणून पदभार स्वीकारला आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी रविवारी (२९ जून २०२५) पुरी येथील मंदिराजवळ झालेल्या चेंगराचेंगरीबद्दल भगवान जगन्नाथाच्या भक्तांची माफी मागितली. या घटनेत किमान तीन जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे श्री गुंडीचा मंदिराजवळ झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे ५० जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री माझी यांनी ‘एक्स’ वर पोस्ट करत म्हटले आहे की, “मी आणि माझे सरकार सर्व जगन्नाथ भक्तांची माफी मागतो. चेंगराचेंगरीत जीव गमावलेल्या भाविकांच्या कुटुंबियांबद्दल आम्ही संवेदना व्यक्त करतो… महाप्रभु जगन्नाथ यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना करतो. सुरक्षेतील त्रुटीची चौकशी केली जाईल आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App