• Download App
    सिडनीत लॉकडाउन उठविण्यात आल्याने एकच जल्लोष, नागरिकांची रस्त्यावर गर्दी |Lockdown lifted from Sydney

    सिडनीत लॉकडाउन उठविण्यात आल्याने एकच जल्लोष, नागरिकांची रस्त्यावर गर्दी

     

    सिडनी – कोरोनाच्या जागतिक साथीमुळे प्रदीर्घ लॉकडाउनला सामोरे गेल्यानंतर सिडनीवासीयांसाठी अखेर १०८ वा दिवस सुदैवी ठरला. चार महिन्यांच्या कालावधीतील १०७ दिवस लागू राहिलेले निर्बंध उठविण्यात आल्यामुळे सिडनीवासीयांनी जल्लोष केला.Lockdown lifted from Sydney

    आता लसीकरण पूर्ण झालेल्यांसाठी बहुतेक निर्बंध लागू नाहीत.आता लोकांना एकत्र भोजन करणे, जिममध्ये जाणे, ग्रंथालयास भेट देणे, तरणतलावावर जाणे अशा गोष्टी नेहमीसारख्या करता येईल. सर्वाधिक मोठ्या रांगा केशकर्तनालय आणि नखांच्या सलूनपाशी होत्या.



    सोमवारी मध्य रात्रीपासूनच दुकाने आणि पब उघडण्यात आली. त्यामुळे तेथे नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. अनेक बाबतीत सिडनीवासीयांनी स्वातंत्र्य नव्याने अनुभवता आले. अनेकांनी प्रियजनांच्या भेटीगाठींचे नियोजन केले.

    नातेवाईक आणि मित्रांना भेटण्यासाठी प्रवास करण्याची संधीही अनेकांना मिळाली. याआधी विभागातून पाच किलोमीटरच्या पलिकडे सबळ कारणाशिवाय प्रवास करण्यास मनाई होती.

    Lockdown lifted from Sydney

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Jio Reaches : जागतिक पेटंट क्रमवारीत टॉप-20 मध्ये पोहोचले जिओ:असे करणारी एकमेव भारतीय टेक कंपनी बनली; 320 स्थानांची झेप घेतली

    NEET Re-Exam 2026 : NEET पुनर्परीक्षेपर्यंत प्रश्नपत्रिका तयार करणारे लॉकडाउनमध्ये राहतील; अनोळखी ठिकाणी मोबाईलशिवाय राहतील, कोणालाही भेटू दिले जाणार नाही

    Patna Coaching Row : रोशन आनंद यांचा दावा- खान सरांनी भावाला मारले:खान सर म्हणाले- नेपाळमध्ये आजाराने मृत्यू झाला